पुणे । बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत वरिष्ठ बिलियर्ड्स मुलांच्या गटात पीएसपीबीच्या ध्रुव सितवाला, सौरव कोठारी, सिद्धार्थ पारीख या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा सहज पराभव करून बाद फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत वरिष्ठ बिलियर्ड्स गटात गटसाखळी फेरीत क गटात पीएसपीबीच्या ध्रुव सितवाला याने तामिळनाडूच्या बी. जगदीश 3-1(40-152, 151(88)-107(60), 151(54)-70, 152(99)-78) असा पराभव करून बाद फेरी गाठली.
ड गटात पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डच्या सौरव कोठारी याने गुजरातच्या पार्थिव झवेरीवर 3-0(151(110)-09, 150(55)-81, 155(115)-36)असा एकतर्फी विजय मिळवत बाद फेरीत धडक मारली. इ गटात आरएसपीबीच्या सिद्धार्थ पारीख याने शाहबाज खानचा 3-0(151-85, 152(87)-75(69), 150(150)-02) असा पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल।
गटसाखळी फेरी।
वरिष्ठ बिलियर्ड्स।
गट अ: एस. श्रीकृष्णा(पीएसपीबी) वि.वि.लौकिक पी.(आरएसपीबी)3-1(150(100)-111(59), 150(94)-61, 106(78)-150(63), 150-118);
गट अ: अमित शर्मा(दिल्ली)वि.वि.व्ही. सुशील(आंध्रप्रदेश)3-1(152-111, 147-150, 150-110, 152-85);
गट ब: ध्व्ज हरिया(पीएसपीबी)वि.वि.आय.एच.मनुदेव(कर्नाटक)3-0(150(75)-89, 150(52,52)-71, 150(57,58)-60);
गट क: अंकित करीवाला(पश्चिम बंगाल)वि.वि.अतीत शहा(केरळ)3-0(151-62, 151(61)-124, 151-92);
गट क: ध्रुव सितवाला(पीएसपीबी)वि.वि.बी. जगदीश(तामिळनाडू)3-1(40-152, 151(88)-107(60), 151(54)-70, 152(99)-78);
गट ड: सौरव कोठारी(पीएसपीबी)वि.वि.पार्थिव झवेरी(गुजरात)3-0(151(110)-09, 150(55)-81, 155(115)-36);
गट ड: भुवनेश्वर डी.(तामिळनाडू)वि.वि.कन कन शामसी(उत्तरप्रदेश)3-2(136-150, 150-110, 88-152(52), 150-115, 150(50)-148);
गट इ: सिद्धार्थ पारीख(आरएसपीबी)वि.वि.शाहबाज खान(आरएसपीबी)3-0(151-85, 152(87)-75(69), 150(150)-02);
गट फ: रोहन जांबूसारिया(महाराष्ट्र)वि.वि. मनमित सिंग(आरएसपीबी)3-1(150(77)-137, 53-150(78), 150(86,64)-34, 150(86,58)-83);
गट फ: मनन चंद्रा(पीएसपीबी)वि.वि.सुब्रत दास(ओडिशा)3-0(152(124)-13, 150(97)-23, 151(71)-101);
गट ग: बी. भास्कर(कर्नाटक)वि.वि.अरुण अगरवाल(महाराष्ट्र)3-2(112-151, 116-151, 150-79, 151-15, 151-17);
गट ह: रुपेश शहा(पीएसपीबी)वि.वि.रफत हबीब(आरएसपीबी)3-0(152-19, 151(96)-63, 151(91)-40);
गट ह: कुणाल अगरवाल(ओडिशा)वि.वि.सिद्धार्थ पटणी(मध्यप्रदेश)3-1(121-150(53), 152-78, 151-135, 150(67)-120);
पॅरा स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत शयान शेट्टी, हरविंदर सिंग, उदित राय, अनंत मेहता यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने आयोजित पहिल्या पॅरा स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या शयान शेट्टी, अनंत मेहता व हरविंदर सिंग, मध्यप्रदेशच्या उदित राय यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत राउंड रॉबिन फेरीत पुण्याच्या शयान शेट्टी याने औरंगाबादच्या हरविंदर सिंगचा 2-0(57-03, 48-01) असा पराभव केला. औरंगाबादच्या हरविंदर सिंग याने तामिळनाडूच्या सी. बालाजीचा 2-0(31-00, 24-09) असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
पॅरा स्नूकर।
राउंड रॉबिन फेरी।
शयान शेट्टी(महाराष्ट्र)वि.वि.हरविंदर सिंग(महाराष्ट्र)2-0(57-03, 48-01);
हरविंदर सिंग(महाराष्ट्र)वि.वि.सी. बालाजी(तामिळनाडू)2-0(31-00, 24-09).
अनंत मेहता(महाराष्ट्र)वि.वि.उदित रराय(मध्यप्रदेश)2-0(53-04, 38-17);
उदित राय(मध्यप्रदेश)वि.वि.शशीधर कुलकर्णी(कर्नाटक) 41-09, 44-09);
शयान शेट्टी(महाराष्ट्र)वि.वि.सी. बालाजी(तामिळनाडू) 2-0(54-02, 28-01);
अनंत मेहता(महाराष्ट्र)वि.वि.शशिधर कुलकर्णी(कर्नाटक)2-0(38-27, 45-14).