सध्या भारतीय क्रिकेट प्रशासनात अनेक महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला नवे अध्यक्ष आणि नवी कार्यकारणी मिळाली. त्यानंतर आता बीसीसीआयच्या शिखर परिषदेची (BCCI Apex Council) निवडणूक शनिवारी (29 ऑक्टोबर) पार पडली. यामध्ये पुरुष खेळाडूंचे प्रतिनिधी म्हणून भारताचे माजी कर्णधार व 1983 क्रिकेट विश्वविजेत्या संघाचे सदस्य दिलीप वेंगसरकर (Dilip Vengasarkar) व महिला खेळाडूंची प्रतिनिधी म्हणून शोभा कुलकर्णी यांची निवड केली गेली.
बीसीसीआयच्या शिखर परिषदेत खेळाडूंचे प्रतिनिधी म्हणून प्रत्येकी एक माजी महिला व एक माजी पुरुष क्रिकेटपटू ची निवड केली जाते. 2019 पासून ही जबाबदारी अंशुमन गायकवाड व शांता रंगास्वामी हे पार पाडत होते. त्यानंतर, पुरुष खेळाडूंचे प्रतिनिधी म्हणून वेंगसरकर व माजी भारतीय क्रिकेटपटू अशोक मल्होत्रा यांच्या दरम्यान लढत झाली. यात वेंगसरकर यांनी 302 विरूद्ध 230 असा विजय मिळवला. विसरकर यांना बीसीसीआयमधील प्रशासकीय कामाचा पुरेसा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व निवड समितीचे प्रमुख अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. वेंगसरकर यांच्यासह महिला क्रिकेटपटूंची प्रतिनिधी म्हणून शोभा कुलकर्णी यांची वर्णी लागली. भारतासाठी क्रिकेट खेळलेल्या कुलकर्णी यांनी महिला क्रिकेट संघटनेच्या सचिव म्हणून देखील काम पाहिले आहे.
भारताचा माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा हा देखील बीसीसीआय गव्हर्निंग कौन्सिलमधील आपले पद वाचवण्यात यशस्वी ठरला. त्याने विजय मोहन राज यांचा पराभव केला.
याव्यतिरिक्त अंशुमन गायकवाड यांची इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या (Indian Cricketers Association) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. शांता रंगास्वामी व माजी भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र सिंग हे सदस्य असतील. तर, हितेश मुजुमदार यांची सचिव व व्ही कृष्णास्वामी यांची खजिनदार म्हणून निवड झाली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडचा विश्वचषकातील दुसरा विजय, श्रीलंकेला हरवताच विलियम्सन झाला भलताच खुश
फक्त हे काम केल्याने ऑस्ट्रेलियात नेहमी यशस्वी होतो विराट; आकडेवारीही झकास