भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी (२८ ऑक्टोबर) येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र मुंबई इंडियन्सचा प्रतिभावान फलंदाज सूर्यकुमार यादवला कोणत्याही संघात संधी देण्यात आली नाही. त्यामुळे माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी निवड समितीवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीकडे या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू वेंगसरकर म्हणाले की, “सूर्यकुमारला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आले नाही. त्यामुळे मी चकित झालो आहे. तो आपल्या देशाच्या सर्वात प्रतिभाशाली फलंदाजांपैकी एक आहे. मी त्याच्या फलंदाजी क्षमतेची तुलना भारतीय संघातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांशी करतो. पण मला कळत नाहीये, त्याला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागेल?”
“सूर्यकुमार भारतीय संघासाठी मधल्या फळीपासून ते ७व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करण्यासाठी योग्य खेळाडू ठरला असता. तो दुखापतीचे सबब लावून संघाबाहेर ठेवण्यात आलेल्या रोहित शर्माची जागा घेऊ शकला असता. सूर्यकुमार सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. तसेच तो पूर्णपणे तंदुरुस्तदेखील आहे. त्यामुळे त्याला संधी मिळायला हवी होती,” असे पुढे बोलताना वेंगसरकरांनी सांगितले.
एवढेच नव्हे तर, त्यांनी बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीकडे सूर्यकुमारला भारतीय संघात स्थान न देण्यामागच्या कारणाचा तपास करण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये बळींचे शतक पूर्ण करणाऱ्या ‘बुमराह’सोबत अनोखा योगायोग; वाचून शाॅक व्हाल
आयपीएल स्पर्धेतून माघार घेतलेला सुरेश रैना ‘या’ टीव्ही शोमधून येणार चाहत्यांच्या भेटीला
ट्रेंडिंग लेख-
Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट
SRH विरुद्ध केलेल्या ‘या’ तीन चुकांमुळे DC चं ‘प्ले ऑफ’ तिकीट लांबणीवर
हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय