Dilip Vengarsarkar On Sachin Tendulkar :- क्रिकेटजगतातील महान फलंदाजांमध्ये सचिन तेंडूलकरची गणना केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर जमा आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांची शंभरी पार करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. याच सचिनबद्दल माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
फिरकीपटूंना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर अर्शद अयुब आणि वेंकटपथी राजू सारख्या सक्षम गोलंदाजांविरुद्ध सचिनची फलंदाजी पाहून वेंगसरकर यांना त्याच्या उज्ज्वल भविष्याची जाणीव झाली होती. याबरोबरच वेंगसरकर यांनी सचिनसोबत हैदराबादविरुद्ध केलेल्या मोठ्या भागीदारीची आठवण काढली.
भारत आणि मुंबईसाठी सचिनसोबत खेळलेल्या वेंगसरकर यांनी हैदराबादविरुद्ध त्यांच्या ज्युनियर जोडीदारासोबत केलेल्या लांबलचक भागीदारीची आठवण सांगताना म्हटले, “मला आठवते, आम्ही हैदराबादविरुद्ध फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर खेळत होतो. अर्शद अयुब आणि वेंकटपथी राजू गोलंदाजी करत होते. ते दोघेही खूप चांगले गोलंदाज होते. सचिन आणि माझी त्यांच्याविरुद्ध मोठी भागीदारी झाली होती.”
वेंगसरकर यांनी एका पुस्तकाचे प्रकाशन करताना सांगितले की, या भागीदारीमुळे त्यांना तेंडुलकरच्या भविष्याची झलक दिसली होती. ते म्हणाले, “फिरकीपटूंना पोषक खेळपट्टीवर सचिन खूप चांगला खेळत होता. तेव्हाच मला समजले की, तो जगभात कुठेही दमदार फलंदाजी करेल आणि तेच घडले.”
यावेळी वेंगसरकर यांनी 1991 मध्ये मुंबई आणि हरियाणा यांच्यात झालेल्या रणजी ट्रॉफीच्या संस्मरणीय अंतिम सामन्याच्या आठवणी सांगितल्या. या सामन्यात कपिल देवच्या नेतृत्वाखालील हरियाणाने मुंबईचा दोन धावांनी पराभव केला होता. या सामन्यात वेंगसरकरने 139 धावांचे योगदान दिले, तर सचिनने 96 धावांचे योगदान दिले होते. वेंगसरकर म्हणाले, “आम्ही 1991 मध्ये हरियाणाविरुद्ध रणजी ट्रॉफी फायनल खेळलो. विजयासाठी 355 धावांचा पाठलाग करताना आम्ही 22 धावांत तीन विकेट गमावल्या (धावसंख्या 34 धावा). त्या डावात त्याने ज्याप्रकारे फलंदाजी केली ती चमकदार होती, जर तो आणखी काही षटके राहिला असता तर आम्ही सामना जिंकू शकलो असतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
धोनी, रोहित, कपिल देव नव्हे ‘हा’ आहे भारताचा महान कर्णधार! इंग्लंडच्या दिग्गजाचं खळबळजनक वक्तव्य
काय सांगता! धोनीनं केली 15 कोटी रुपयांची फसवणूक? बीसीसीआयनं उत्तर मागितलं
भारतीय संस्कार! कांस्यपदक जिंकताच हाॅकी संघ देव दर्शनाला, पाहा सुंदर VIDEO