Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘आपली अडचण आपल्यालाच सोडवावी लागणार…’, कार्तिकडून केएल राहुलला पाठबळ!

'आपली अडचण आपल्यालाच सोडवावी लागणार...', कार्तिकडून केएल राहुलला पाठबळ!

February 23, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/BCCI

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारतीय संघाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या संघातून बाहेर आहे. भारताचा अनुभवी सलामीवीर केएल राहुल सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत खेळत आहे. पण मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात राहुलला अपेक्षित खेळी करता आली नाही. याच पार्श्वभूमीवर मालिकेतील तिसऱ्या सामन्यत राहुलला खेळण्याची संधी मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. राहुलवर होत असलेल्या टीकांमुळे दिनेश कार्तिक मात्र नाराज आहे.

केएल राहुल (KL Rahul) नागपूरमध्ये खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 20 धावा करून बाद झाला होता. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याने 17 आणि 1 अशी खेळी केली. दिल्लीत राहुल एक धाव करून बाद झाल्यानंतर त्याच्याविरोधात होणाऱ्या टीकांनी अधिकच जोर धरला. दिनेश कार्तिकच्या मते केएल राहुलसाठी हा काळ खडतर आहे. स्वतः कार्तिकला देखील अशा कठीण काळातून जावे लागले होते. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) म्हणाला, “मी देखील कारकिर्दीत अशा काळातून गेलो आहे, जेव्हा मी वॉशरूममध्ये जाऊन खूप रडलो आहे. हे एक प्रोफेशनल जग आहे. तुम्हाला तुमच्या अडचणी स्वतः सोडवायच्या आहेत. मला नेहमी असे वाटायचे की, प्रत्येक इंनिंग ही माझ्या कारकिर्दीतील शेवटची इनिंग असू शकते.”

दिनेश कार्तिकच्या मते राहुलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले, तर ते फक्त दिल्ली कसोटीतील त्याच्या खराब कामगिरीमुळे नसेल. राहुल मागच्या मोठ्या काळापासून राहुलची बॅट शांत असल्यामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो. “मी अनेकदा ड्रेसिंग रूममध्ये जाऊन गपचूक रडत बसलो आहे. जेव्हा कधी असे व्हायचे, तेव्हा वाईट वाटे. पण अनेकदा गोष्टी आपल्या हातत नसतात. इंदोर कसोटीत त्याला संधी मिळाली नाही, तर यासाठी कारणीभूत दिल्ली कसोटीतील त्याचे प्रदर्शन नसेल. मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या मालिकेनंतकर सुरू असलेल्या खराब प्रदर्शनामुळे हा निर्णय होऊ शकतो.”

राहुलची बॅट सध्या शांत असली, तरी त्याची गुणवत्ता संघाला अनेकदा विजयी कसण्यासाठी कामी आली आहे. कार्तिकच्या मते राहुल सध्या खराब फॉर्ममध्ये असला तरी लवकरच तो पुनरागमन करेल. “राहुल एक चांगला खेळाडू आहे आणि त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगले प्रदर्शन केले. मला वाटते तो चांगले पुनरागमन करू शकतो. पण इंदोर कसोटीत त्याच्या जागी शुबमन गिल () याला संधी मिलू शकते,” असे कार्तिक पुढे म्हणाला.

दरम्यान, केएल राहुल डिसेंबर 2021 मध्ये भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार बनला होता. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटीसाठी बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघात राहुलकडून हे उपकर्णधारपद काढून घेतले गेले. असात प्लेइंग इलेव्हनमधील त्याचे स्थान देखील धोक्यात असल्याचे दिसत आहे. मागच्या 9 कसोटी इनिंगमध्ये राहुलने 23 धावांची सर्वात मोठी खेळी केली आहे. (Dines Karthik provided support to KL Rahul who was in poor form)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“आधी देश आणि मग मुंबई इंडियन्स”, बुमराहच्या मुद्द्यावर बरसला भारतीय दिग्गज
आयपीएल इतिहासात ‘या’ संघावर आली 14 वेळा कर्णधार बदलण्याची वेळ; पाहा सर्व संघ अन् त्यांच्या कॅप्टन्सची यादी


Next Post
Photo Courtesy: Twitter/ICC

"मला टीम इंडियाला या वर्षात दोनदा जगज्जेता होताना पाहायचेय", गावसकरांनी व्यक्त केली इच्छा

David-Warner

डेविड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या तयारीत! फॉर्ममध्ये येण्यासाठी हातात बाकी आहेत थोडेच दिवस

Shoaib Akhtar

लाईव्ह शोमध्ये सुटला अख्तरचा जिभेवरचा ताबा, खराब इंग्लिशमुळे सहकाऱ्याचा अपमान

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143