---Advertisement---

अतिशय वाईट काळातून जात असताना कार्तिकच्या जीवनात आली ही मुलगी, सगळं आयुष्यचं टाकलं बदलून

On: शनिवार, ऑगस्ट 22, 2020 6:33 PM
---Advertisement---

मुंबई । भारतीय यष्टिरक्षक फलंदाज आणि स्क्वॉश खेळाडू दीपिका पल्लीकल यांचा सुपर कपलमध्ये समावेश होते. 21 ऑगस्ट रोजी दोघांच्याही लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने दोघांनी आपल्या सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहेत.

भारतीय फलंदाज दिनेश कार्तिक याची पत्नी दीपिका पल्लीकल ही स्क्वॉशपटू आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत तिने देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत. ती भारताची प्रथम क्रमांकाची स्क्वॉश खेळाडू राहिली आहे.

दिनेश आणि दीपिकाचे लग्न 18 ऑगस्ट 2015 रोजी आधी ख्रिश्चन आणि नंतर हिंदू रीति-रिवाजांनी झाले होते. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर हे जोडपे आनंदी जीवन जगत आहे आणि बऱ्याचदा सोशल मीडियावर चाहत्यांसाठी त्यांचे सुंदर फोटे शेअर करतात. दिनेश कार्तिकचे पहिले लग्न यशस्वी झाले नाही, परंतु दीपिका आल्यामुळे त्यांचे आयुष्य आनंदाने भरले गेले.

दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांची जिममध्ये पहिली भेट होती, त्यावेळी दोघांचेही फिटनेस ट्रेनर एकच होते. त्यांची भेट झाली पण त्यांची मैत्री पुढे वाढत नव्हती. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे दीपिकाला क्रिकेटर्स आवडत नाहीत किंवा तिला क्रिकेटर्सचा तिरस्कार होता. कारण दीपिकाला असे वाटत होते की, क्रिकेटर्सला मिळणारी प्रसिद्धी इतर कोणत्याही खेळातील खेळाडूंपेक्षा जास्त आहे. क्रिकेटर्सप्रमाणे इतर खेळातील खेळाडूंना प्रसिद्धी मिळत नव्हती जे की ते मिळायला हवे होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---