आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा चेन्नई सुपर किंग्सने पराभव केला होता. मात्र काल 23 सप्टेंबर रोजी झालेल्या पाचव्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाचा 49 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 195 धावा केल्या होत्या. त्यास प्रत्युत्तर म्हणून केकेआर संघ 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 146 धावा करू शकला.
फलंदाजीत आणि गोलंदाजीत करावी लागेल सुधारणा
संघाच्या या पराभवामुळे केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिक खूप निराश दिसत होता. या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, “मला वाटते की आम्हाला आमच्या फलंदाजीत व गोलंदाजीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आमच्यासाठी हा एक अतिशय वाईट दिवस होता. मी त्याबद्दल फारसे विश्लेषन करू इच्छित नाही. कुठे सुधारणा करायची याची कल्पना संघातील खेळाडूंना आहे.”
‘या’ खेळाडूंनी अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही
केकेआर संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि फलंदाज ओएन मॉर्गनने अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही, असे कर्णधार दिनेश कार्तिकला वाटते. या दोघांच्या कामगिरीवर बोलतांना तो म्हणाला, “कमिन्स आणि मॉर्गन या दोघांनीही क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. अशा उष्ण वातावरणात खेळणे खूप अवघड आहे.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “मला जास्त विश्लेषन करायचं नाही. संघातील खेळाडूंनी चांगला प्रयत्न केला. आशा आहे की येत्या सामन्यांमध्ये आम्ही आणखी चांगली कामगिरी करू. याक्षणी मी वरच्या क्रमांकाच्या फलंदाजांबद्दल केकेआरचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्यूलमशी जास्त बोललो नाही. पण पुढच्या सामन्यात तुम्हाला कळेल की आम्ही कोणत्या फलंदाजांना वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संधी देऊ.”
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पुढील सामना शनिवारी 26 सप्टेंबर रोजी सनरायझर्स हैदराबाद संघाशी होणार आहे. हा सामना जिंकून केकेआरचा संघ गुणतालिकेत त्यांचे खाते उघडायला तयार आहे. हैदराबादलाही पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-२ मोठे विक्रम केले पण ‘या’ गोष्टीमुळे मोठ्या विक्रमापासून रोहित शर्मा राहिला दूर
-एका मराठी चाहत्याला आपलं शेवटचं ट्विट करत या महान क्रिकेटपटूने जगातून घेतली एक्झिट
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये एकाच षटकात ३० किंवा त्याहून अधिक धावा देणारे ७ गोलंदाज
-कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळणारे जगातील ३ सर्वोत्तम फलंदाज
-श्रीसंतने मिसबाहचा झेल पकडला आणि….