आगामी 2025च्या आयसीसी चॅम्पियन्स (Champions Trophy) ट्राॅफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. त्यासाठी भारतीय संघाकडे केवळ 3 एकदिवसीय सामने राहिले आहेत. नुकताच भारतीय संघाचा श्रीलंका दौरा संपला. श्रीलंका दौऱ्यावर भारतानं 3 एकदिवसीय सामने सामने खेळले. त्यामध्ये भारतीय संघ एकही सामना जिंकू शकला नाही. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली एकदिवसीय मालिका काही खास राहिली नाही. कारण 27 वर्षांनंतर भारतानं श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय गमावली.
श्रीलंका दौऱ्यावर पहिला सामना बरोबरीत सुटला होता. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 32 धावांनी पराभव केला, तर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला 110 धावांनी भलामोठा पराभव स्वीकारावा लागला. श्रीलंकेनं 2-0 ने ही मालिका खिशात घातली. तिन्ही सामन्यात भारताची फलंदाजी फ्लाॅप ठरली. भारताला आता त्यांच्या चुका सुधारण्याची गरज आहे. कारण चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी त्यांच्याकडे केवळ 3 एकदिवसीय सामने राहिले आहेत. तत्पूर्वी दिनेश कार्तिकनं श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाची कामगिरी पाहून मोठं वक्तव्य केलं आहे.
माजी भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) क्रिकबझशी बोलताना म्हणाला की, “मला विश्वास आहे, भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जसा होता तसा दिसणार नाही. काही बदल होतील. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, भारतीय संघ आता त्या टप्प्यावर पोहोचला आहे, जिथं तुम्हाला मोठ्या स्पर्धांचा सामना करावा लागणार आहे. चॅम्पियन्स ट्राॅफी पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्च दरम्यान पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे.”
दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं भारतासाठी 26 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 25च्या सरासरीनं फलंदाजी करताना 1,025 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नाववर 7 अर्धशतक आणि 1 शतक आहे. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 129 राहिली, तर 94 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं 30.20च्या सरासरीनं 1,752 धावा केल्या. यादरम्यान त्यानं 9 अर्धशतक झळकावली. 60 टी20 सामन्यांमध्ये त्यानं 686 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 142.61 राहिला. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 1 अर्धशतक झळकावलं आहे.
हेही वाचा-
अरेरे! ऑस्ट्रेलियन नागरिक त्यांच्या विश्वविजेत्या कर्णधारालाच ओळखू शकत नाही! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
राहुल द्रविडची फलंदाजी तर खूप पाहिली असेल, आता गोलंदाजी पाहा
सुवर्णपदक विजयाच्या आनंदावर विरजण, हेड कोचला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि…