शुक्रवारी (दि. 30 डिसेंबर) क्रिकेटविश्वाला त्यातल्या त्यात भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा अपघात झाला. या अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्या डोक्याला, गुडघ्याला गंभीर दुखापती झाल्या. याव्यतिरिक्त त्याच्या पाठ आणि पायालाही जबर मार बसला. या दुर्दैवी घटनेनंतर भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने एक लक्षवेधी ट्विट केले आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant) याचा अपघात 30 डिसेंबर रोजी उत्तराखंडमधील रुरकी या त्याच्या गावी जात असताना झाला. त्यानंतर त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर त्याला दिल्लीतील खासगी मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. बीसीसीआयने त्याच्या अपघातानंतर त्याला सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.
या घटनेनंतर भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक यानेही ट्विट केले. त्याने लिहिले,
Really shocking to know about the accident. Good to know that he's out of danger. My prayers and wishes with you @RishabhPant17.
Recover soon brother.— DK (@DineshKarthik) December 30, 2022
‘अपघाताबद्दल ऐकून वाईट वाटले. मात्र तो बरा असल्याचे ऐकून आनंद झाला. माझ्या प्रार्थना व शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत. लवकर बरा हो.’
Also request everyone to pls pls not share photos of him in bandages & injuries and give him & his family some space and privacy. Let's be human 🙏
— DK (@DineshKarthik) December 30, 2022
याच ट्विटमध्ये त्याने लोकांना एक आवाहनही केले. त्याने लिहिले,
‘माझी सर्वांना विनंती आहे की, कोणीही त्याचे बॅंडेज बांधलेले व दुखापतग्रस्त झालेली छायाचित्रे पुढे फॉरवर्ड करू नका. या काळात त्याच्या कुटुंबाला थोडे सहकार्य आणि गोपनीयता हवी आहे. थोडे माणूस व्हा.’
रिषभ नुकत्याच झालेल्या बांगलादेश दौऱ्यानंतर भारतात परतला होता. काही दिवस दुबईमध्ये घालवून तो भारतात माघारी आलेला. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांसाठी त्याची भारतीय संघात निवड होऊ शकली नव्हती. त्यामुळे तो यानंतर बेंगलोर येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी हजेरी लावणार होता.
(Dinesh Karthik Request To People Not Share Rishabh Pant Pictures)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंतच्या अपघाताविषयी बीसीसीआयची मोठी अपडेट, बोर्ड कुटुंबियांच्या सतत संपर्कात
Rishabh Pant Car Accident: एका डुलकीने पंतची कारकिर्द धोक्यात! इतके दिवस राहणार क्रिकेटपासून दूर?