इंडियन प्रीमियर लीगच्या फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सचा माजी कर्णधार दिनेश कार्तिकने एक किस्सा शेअर केला आहे, जो त्याच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. जो किस्सा संघाचा मालक शाहरुख खानबद्दल आहे. शाहरुख खानने एकदा त्याच्यासाठी असे काहीतरी केले होते, जे तो आयुष्यभर विसरू शकणार नाही.
दिनेश कार्तिक हा 2018 पासून कोलकाता नाईट रायडर्सचा एक भाग आहे. कार्तिकने सांगितले आहे की, जेव्हा तो आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एका अत्यंत कठीण काळातून जात होता, तेव्हा त्यावेळी शाहरुख खानने त्याला आनंदी करण्यासाठी काहीतरी केले, हे ऐकून तुम्हालाही आनंद होईल.
कार्तिकसाठी प्रायव्हेट जेट पाठविले होते
दिनेश कार्तिकने गौरव कपूर निवेदन करत असलेल्या पॉडकास्ट ’22 यार्न’वर शाहरुखबद्दल सांगितले, ‘त्याच्यासारख्या मोठ्या मनाचे लोक आजच्या जगात फारच कमी आहेत आणि जगाला त्यांच्यासारख्या लोकांची खूप गरज आहे. तो खूप प्रामाणिक आहे आणि सर्वांची काळजी घेत असतात. माझ्या आयुष्यात जे काही घडले, तेव्हा ते माझ्यासाठी खासगी जेट घेऊन स्वतःच्या खर्चाने चेन्नईहून दुबईला लोकांना घेऊन आले होते.’
कार्तिक पुढे म्हणाला की, ‘मला माहित नाही की हे किती फ्रँचायझी करतील. पण माझाही या सगळ्यांवर विश्वास बसत नव्हता आणि हे सगळे मला खरं वाटत नव्हते. मी आयुष्यात कधीही खासगी विमानात बसलो नव्हतो. त्यांच्या या वागण्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा माझे मन जिंकले. मी त्यांच्यासाठी काहीही करू शकतो, ते एक खूपच चांगले व्यक्ती आहेत.’
कार्तिकचे शाहरुखशी कसे संबंध आहेत
कार्तिकने सांगितले की, शाहरुख खानने त्रिनिदादमध्ये कसा चांगला वेळ घालवला. तो पुढे म्हणाला की, ‘ते मला त्रिनिदाद येथे घेऊन गेले. तेही तेथे काही दिवस राहिले. त्यांचा सीपीएलमधील एक संघ ट्रिनबागो नाइट रायडर्स आहे. मी त्यांच्याबरोबर जेवण देखील केले.’
कार्तिक पुढे म्हणाला की, ‘मी त्रिनिदादच्या रस्त्यावर वडा पाव देखील खाल्ला होता. त्रिनिदाद येथेही त्यांचा एक खूप मोठा चाहता वर्ग आहे, तिथे गेल्यावर त्यांना टोपी घालून बसावं लागलं होता. पण यातल्या काही आठवणी वाईट आहेत, तरी अशा काही गोष्टी आहेत, ज्या आपण कधीही विसरू शकत नाही आणि त्यांच्याबरोबर माझा एक चांगला काळ घालवला आहे.’
कार्तिक सध्या इंग्लंडमध्ये आहे. तसेच तो तिथे आंतरराष्ट्रीय सामन्यांत समालोचन करताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
नाबाद अर्धशतकासह ‘गब्बर’ बनला दस हजारी मनसबदार; दिग्गज सलामीवीरांच्या यादीत मिळवले मानाचे स्थान
इंग्लंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय! बटलरचे धमाकेदार पुनरागमन, मोईन अलीने दाखवला अष्टपैलू खेळ