घाटकोपर। क्रांती क्रीडा मंडळाच्या ६० व्या पदार्पण वर्षानिमित्त कै. कॉम्रेड वसंत परब मैदान, भटवाडी, घाटकोपर येथे दि. ०४ जाने. ते १२ जाने. २०२० या कालावधीत ४५ वा जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. क्रीड़ा महोत्सवा ३ जानेवारीला उद्घाटन होणार असले तरी कबड्डी स्पर्धाला दिनांक ४ जानेवारीपासून सुरुवात होईल.
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. या कबड्डी क्रीडा महोत्सवात प्रथम श्रेणी पुरुष गट २४ संघ, द्वितीय श्रेणी पुरुष गट ४० संघ, महिला गट १० संघ व किशोर गट (मुले ) ८ संघ सहभागी होणार आहेत. कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दि. ०४ जाने रोजी सायंकाळी ७ वा. संपन्न होईल.
श्री.अमोलजी गजानन किर्तिकर (अध्यक्ष- मुंबई उपनगर कबड्डी असो.), श्री. दशरथ शिर्क (सल्लागार क्रांती क्रीडा मंडळ), श्री. मंगेश परब (सल्लागार क्रांती क्रीडा मंडळ) हे सोहळ्याचे उद्घाटन करतील. प्रमुख पाहूणे म्हणून श्री. प्रतापराव शिंदे (उपाध्यक्ष- मुंबई उपनगर कबड्डी असो.), श्री. सुधाकर घाग(कार्याध्यक्ष- मुंबई उपनगर कबड्डी असो.), श्री पांडुरंग पार्टे, श्री इंद्रजित मोरे, श्री निलेश जंगम, श्री रमेश हरयाण, श्री प्रताप शेट्टी, श्री दशरथ शिंदे, श्री राजन अनभवणे, श्री सतीश चव्हाण यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत स्वस्तिक, अमर क्रीडा मंडळ संघाचा बादफेरीत प्रवेश
वाचा????https://t.co/KWu7F4uexM????#Kabaddi #म #मराठी— Maha Sports (@Maha_Sports) January 4, 2020
पृथ्वी शॉ समोरील संकट वाढले, टीम इंडियातील पुनरागमन लांबणार?
वाचा????https://t.co/FXQCGKUudw????#म #मराठी #Cricket #RanjiTrophy @PrithviShaw— Maha Sports (@Maha_Sports) January 4, 2020