बदलापूर। ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व श्री गणेश क्रीडा मंडळ च्यावतीने भव्य जिल्हास्तरीय महिला गट कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ३१ मे २०१९ ते ०२ जून २०१९ या कालावधीत गांधी चौक, मराठी शाळा मैदान, कुळगाव, बदलापूर पूर्व येथे पार पडणार आहे.
यास्पर्धेत एकूण २० महिला संघानी सहभाग घेतला आहे. तीन दिवस होणाऱ्या यास्पर्धेसाठी २ मातीची मैदाने तयार करण्यात आली आहेत. स्पर्धेतील सर्व सामने बाद पध्दतीने खेळवण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील नावाजलेल्या संघापैकी छत्रपती क्रीडा मंडळ डोंबिवली, शिवतेज क्रीडा मंडळ ठाणे, होतकरू मित्र मंडळ ठाणे, प्रेरणा कला क्रीडा मंडळ ठाणे, जय बजरंग क्रीडा वाशिंद, श्री गणेश क्रीडा मंडळ, जय शिव क्रीडा मंडळ बदलापूर, आत्माराम क्रीडा मंडळ डोंबिवली आदी संघांनी सहभाग घेतला आहे.
कार्यक्रम पत्रिका: