‘कॅप्टन कूल’ म्हणून एमएस धोनी क्रिकेटच्या मैदानावर अनेक महत्त्वाचे निर्णय घेत असतो, परंतु त्याच्या घरात मात्र सर्व निर्णय त्यांची पत्नी साक्षी घेत असते. धोनी म्हणतो की तो पत्नीच्या निर्णयामध्ये कधीही हस्तक्षेप करत नाही.
38 वर्षीय माजी कर्णधार धोनी मेट्रोमोनियल वेबसाइटच्या एका कार्यक्रमात गमतीने म्हणाला, “मला माहित आहे की ती आनंदी असेल तरच मी आनंदी राहील.”
धोनीने जूलै 2010 मध्ये साक्षी रावतसोबत लग्न केले आहे.
तो पुढे म्हणाला, “लग्न होईपर्यंत सर्व पुरुष सिंह असतात”. तसेच तो म्हणाला, ‘मी आदर्श नवरा आहे. मी माझ्या पत्नीला सर्व निर्णय घेऊ देतो. मला माहित आहे की ती आनंदी असेल तरच मी आनंदी राहील. जेव्हा मी तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देईल, तेव्हाच माझी पत्नी आनंदी राहील.’
त्याचबरोबर नंतर थोडे गंभीर होत धोनी म्हणाला, वयानुसार संबंध दृढ होतात. तो म्हणाला, ‘लग्नातील वास्तविक सार 50 वर्षांनंतर आहे. आपण 55 वर्षांचे झालो की, हे प्रेमाचे वास्तविक वय असते असे मी म्हणेल. कारण आपण त्यानंतर आपल्या दैनंदिन गोष्टीपासून जरासे दूर होत असतो.’
https://www.instagram.com/p/B5S_sgug17R/
धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. तो भारताकडून त्याचा शेवटचा सामना जूलैमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 2019च्या विश्वचषकातील उपांत्यफेरीत खेळला होता.
दुखापतग्रस्त शिखर धवन ऐवजी या खेळाडूची झाली टीम इंडियात निवड
वाचा👉https://t.co/fVmvQqsMhH👈#म #मराठी #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #INDvsWI #ShikharDhawan— Maha Sports (@Maha_Sports) November 27, 2019
बर्थडे बॉय सुरेश रैनाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?
वाचा👉https://t.co/TRnDI8F4hx👈#म #मराठी #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #SureshRaina #HappyBirthdayRaina— Maha Sports (@Maha_Sports) November 27, 2019