fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

त्यावेळी आम्ही पृथ्वी शॉच्या १० टक्केही आसपास नव्हतो – विराट कोहली

रविवारी (14 आॅक्टोबर) भारत विरुद्ध विंडिज संघातील दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेतील दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवत विंडिजला व्हाईटवॉश दिला.

या मालिकेत 18 वर्षीय युवा फलंदाज पृथ्वी शॉने दमदार कामगिरी करत मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला. त्याने या मालिकेत एक शतक, एक अर्धशतकाच्या सहाय्याने 118.50 च्या सरासरीने 237 धावा केल्या.

त्याच्या या कामगिरीचे आणि निर्भीड फलंदाजीचे भारताचा कर्णधार विराट कोहलीने कौतुक केले आहे.

विराट म्हणाला, ‘त्याच्याकडे पाहुन वाटते की तो तुम्हाला हवी असणारी सुरुवात करुन देतो, विशेष म्हणजे कोणत्याही मालिकेत खेळताना पहिली छाप पाडणे महत्त्वाचे असते. संघात असा निडर खेळाडू असणे चांगले असते. तो चूकीचा नसून त्याच्यामध्ये त्याच्या खेळाबद्दल पूर्ण आत्मविश्वास आहे.’

‘बऱ्याचदा चेंडू पृथ्वीच्या बॅटवर येतो पण क्वचितच असे होते की चेंडू त्याच्या बॅटची कड घेतो. ही गोष्ट तो जेव्हा इंग्लंडला असताना नेटमध्ये फलंदाजी करत होता तेव्हाही पहायला मिळली आहे.’

 

‘तो आक्रमक आहे, पण त्याचे खेळताना स्वत:वर नियंत्रण असते. नवीन चेंडूविरुद्ध ही खूप दुर्मिळ गुणवत्ता आहे. त्याला अनेक फटके मारणे माहित आहे आणि त्यावर त्याचे योग्य नियंत्रणही असते. हे खूप चांगले आहे. मला असे वाटत नाही की आम्ही वयाच्या 18-19 व्या वर्षी त्याच्या 10 टक्केही आसपास होतो. पण त्याला यावरुन पुढे जायचे आहे.’

याबरोबरच विराटने रिषभ पंत आणि शॉबद्दल विश्वास व्यक्त करताना त्यांनी आॅस्ट्रेलिया दौऱ्यात 11 जणांच्या संघात स्थान मिळवण्यासाठी भक्कम पर्याय समोर ठेवला आहे.

 

भारताचा आॅस्ट्रेलिया दौरा 21 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारत 3 टी20, 4 कसोटी आणि 3 वनडे सामने खेळणार आहे.

महत्वाच्या बातम्या- 

टीम इंडियात संधी तर मिळाली, त्याच दिवशी सामना जिंकल्यामुळे त्या दोन खेळाडूंना परतावे लागले पुन्हा घरी

ISL 2018: दोनदा विजेतेपद मिळवणाऱ्या या संघांचा सुरू आहे संघर्ष

पृथ्वी शॉ, रिषभ पंतची कसोटी क्रमवारीत मोठी झेप…

You might also like