आयपीएल २०२० च्या पहिल्या सामन्यात गतवर्षीचा विजेता संघ मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्स बरोबर आज (१९ सप्टेंबर) होणार आहे. आबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजता खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी तयारी केली आहे. धोनीच्या चेन्नई संघात अनुभवी खेळाडू, तर रोहितच्या मुंबई संघात युवा उत्साही खेळाडू आहेत.
मुंबईने चेन्नईविरुद्ध आतापर्यंत १७ सामने जिंकले आहेत, तर धोनीच्या संघाला मुंबई विरुद्ध केवळ ११ वेळा विजय मिळवता आला आहे. अशा परिस्थितीत आज दोन्ही संघांमध्ये जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे.
अनुभवी खेळाडूंची कमी
या वेळी मुंबई इंडियन्सला वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची उणीव नक्कीच भासेल. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा मलिंगा यावेळी वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमध्ये खेळत नाही. कर्णधार रोहित शर्मानेही सांगितले होते की, मलिंगाची कमी जाणवेल.
याशिवाय चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी आणि आयपीएलमध्ये सर्वात जास्त सामने खेळणारा फलंदाज सुरेश रैनाही चेन्नईच्या संघात नाही. याशिवाय अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगही धोनीच्या संघात असणार नाही त्यामुळे संघात नवीन चेहरे दिसणार का हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा ड्रीम ११ संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), एमएस धोनी, अंबाती रायडू, फाफ डू प्लेसिस, रोहित शर्मा, सूर्य कुमार यादव, कृणाल पंड्या, दीपक चहर, जसप्रीत बुमराह आणि इम्रान ताहिर
दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११
मुंबई इंडियन्स-
क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा(कर्णधार), सूर्य कुमार यादव, इशान किशन, कृणाल पंड्या, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि नॅथन कुल्टर नाईल
चेन्नई सुपर किंग्स-
शेन वॉटसन, अंबाती रायडू, फाफ डु प्लेसिस, एमएस धोनी(एमएस धोनी), केदार जाधव, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा, पीयूष चावला, दीपक चहर शार्दूल ठाकुर आणि इमरान ताहिर
महत्त्वाच्या बातम्या-
-दीपक चाहराने १५ वर्षांचा जुना फोटो केला शेअर; शेन वॉट्सनसाठी दिला ‘हा’ खास संदेश
-अखेर ऋतुराज गायकवाड पहिला सामना खेळणार की नाही याचे उत्तर मिळाले
-काय सांगता! वयाच्या २५व्या वर्षीच वैतागून ‘त्याने’ केला क्रिकेटला टाटा बाय बाय
ट्रेंडिंग लेख-
-‘या’ ६ खेळाडूंच्या प्रदर्शनावर अवलंबून असेल आजच्या आयपीएल सामन्याचा निकाल
-पहिलाच सामना जिंकायला धोनी ‘या’ ११ खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात
-आयपीएल २०२०: सर्व ८ संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी