भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 डिसेंबर 2020 पासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना दिवस-रात्र कसोटी सामना असून ऍडिलेड येथे खेळला जाईल. मात्र ऍडिलेड येथे कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे येथे पहिला सामना होणार की नाही? हा प्रश्न सर्वानाच पडला आहे. यातच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
दोन ते तीन आठवड्यात होईल अंतिम निर्णय
पहिल्या कसोटी सामन्याच्या आयोजनाबद्दल बोलताना हेजलवूड म्हणाला की, “पहिली कसोटी मेलबर्न किंवा ब्रिस्बेन किंवा इतरत्र कुठेही लाल चेंडूने होऊ शकतो, नंतर आम्ही उन्हाळ्यात ऍडिलेड येथे खेळू शकतो. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ऍडिलेडमध्ये पहिल्या कसोटीचे आयोजन करण्याची अद्यापही संभावना आहे, परंतु यात बदल होऊ शकतो. आम्हाला आशा आहे की, येत्या एक-दोन आठवड्यांत अंतिम निर्णय होईल.”
आशा आहे की पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार होईल सामना
याबद्दल सविस्तर माहिती देताना हेझलवूड म्हणाला की, “संघ सहकार्यांना गाबा (ब्रिस्बेन) येथे ठेवण्यात कोणतीही अडचण नाही. तथापि अपेक्षा आहे की 17 ते 21 डिसेंबर या कालावधीत पहिली कसोटी ऍडिलेड येथे पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार होईल.”
…तर वेगवान गोलंदाजांना होईल आनंद
“जितका जास्त वेळ आम्ही वाट पाहू, तितकीच वातावरणात उष्णता वाढेल, त्यामुळे जर ब्रिस्बेन येथे डिसेंबरमध्ये पहिला सामना खेळला तर वेगवान गोलंदाजांना आनंद होईल. अर्थात ब्रिस्बेनच्या मैदानावर आमच्या संघाचा विक्रम चांगला आहे आणि कसोटी मालिकेची सुरुवात करण्यासाठी ही उत्तम जागा आहे.” असेही पुढे बोलताना हेझलवूड म्हणाला.
ऍडिलेड येथे तयार केली अचूक खेळपट्टी
पहिला कसोटी सामना दिवस-रात्र असल्यामुळे गुलाबी चेंडूने खेळला जाईल. ऍडिलेड येथील खेळपट्टीबद्दल बोलताना हेझलवूड म्हणाला की, “कसोटी मालिकेदरम्यान ऍडिलेड व्यतिरिक्त इतर कोणत्याही मैदानावर गुलाबी चेंडू वापरु नये. पिच क्युरेटरने ऍडिलेड येथे गुलाबी चेंडूसाठी अचूक खेळपट्टी तयार केली आहे. ऑस्ट्रेलियामधील गाबा किंवा पर्थ यासारखी काही मैदाने कडक आहेत. तेथील खेळपट्ट्या गुलाबी चेंडूसाठी उपयुक्त नाही. ठराविक काळानंतर चेंडू मऊ होईल.”
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानावर एकत्र खेळू शकत नाही बुमराह आणि शमी; जाणून घ्या कारण
“मी ८० वर्षाचा म्हातारा….”, लँगर यांच्या पत्राला ब्रॅडमन यांनी दिले होते मजेशीर उत्तर
Video -‘गेलचे अजूनही आरसीबीवर प्रेम!’ वडीलांनी आरसीबीची कॅप घातल्याने चाहत्यांच्या भावूक प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख –
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी