सध्या जगभरात टोकियो येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेची चर्चा होत आहे. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी मोठे यश मिळवले आहे. दरम्यान, या काळात क्रिकेटही ऑलिम्पिकचा भाग असावा, अशी मतं व्यक्त करण्यात आली. याबद्दल चर्चाही झाली. तसेच आयसीसीही गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटला ऑलिम्पिकचा भाग करुन घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच संबधीचे एक खास दृष्य सध्या भारत आणि इंग्लंड संघात नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर सुरु असलल्या कसोटी सामन्यादरम्यान पाहायला मिळाले.
या सामन्यादरम्यान २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेश व्हावा, अशा संदेशाचे पोस्टर एका प्रेक्षकाने झळकावले होते. या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधले. तसेच या पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्याचबरोबर अनेक गमतीशीर प्रतिक्रिया देखील या पोस्टरवर आल्या आहेत.
Cricket for Olympics 2024 poster in the crowd. pic.twitter.com/a6tNEH72C4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 4, 2021
एका वापरकर्त्याने यावर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले की, ‘कोहली कर्णधार असेल, मग ऑलिम्पिक मधूनही उपांत्य फेरीत संघ बाहेर पडेल.’ त्याचबरोबर दुसर्या वापरकर्त्याने लिहिले की, ‘इंग्लंडच्या स्टेडियमवर अशी पोस्टर्स आणू नका, अन्यथा ते क्रिकेटसाठी २० बॉल फॉरमॅट लाँच करतील.’ एकाने लिहिले की, ‘मला वाटत नाही की ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी पुरेसा वेळ असेल.’
https://twitter.com/Arya_Satark/status/1422874677643419653
Bhai england ke stadium me aise poster mat lao nhi to wo 20 ball format launch kar denge Olympics ke liye
— Bleed blue (@Prana30060168) August 4, 2021
https://twitter.com/NOeL_Soars/status/1422875200371138566
जपान येथे सुरु असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने ५ ऑगस्टपर्यंत ५ पदकं जिंकली आहेत. आणखीही काही पदकं येण्याची भारताला अपेक्षा आहे.
तसेच ट्रेंट ब्रिजवर सुरु असलेल्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास दुसऱ्या दिवसाखेर भारताने ४६.४ षटकात ४ बाद १२५ धावा केल्या आहेत. भारताकडून या डावात केएल राहुल ५७ धावांवर नाबाद आहे. तर चेतेश्वर पुजारा (४), विराट कोहली (०) आणि अजिंक्य रहाणे (५) हे प्रमुख फलंदाज मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले आहेत. तसेच त्यापूर्वी इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर संपुष्टात आला आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने ४, मोहम्मद शमीने ३, शार्दुल ठाकूरने २ आणि मोहम्मद सिराजने १ विकेट घेतली आहे. तर इंग्लडकडून कर्णधार जो रुटने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली.
केवळ एकदाच क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश
ऑलिम्पिकच्या इतिहासात केवळ एकदाच क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. १२१ वर्षांपूर्वी म्हणजे १९०० साली पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रान्स विरुद्ध ग्रेट ब्रिटन या संघामध्ये एकमेव क्रिकेट सामना झाला होता. हा सामना ग्रेट ब्रिटनने जिंकत सुवर्णपदक मिळवले होते, तर फ्रान्स रौप्य पदकाचा मानकरी ठरला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
भाड्याने जमीन घेऊन शेती करणाऱ्या कुटुंबातील पोरानं भारताला जिंकून दिलं ‘रौप्य’ पदक
“मी विश्वासाने सांगू शकत नाही की विराट आयसीसी ट्रॉफी जिंकेल की नाही”
अशी २ कारणे, ज्यामुळे नॉटिंघम कसोटीत अश्विनला मिळायला पाहिजे होती संधी