न्यूझीलंडविरुद्ध पुढील महिन्यात २७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या टी२० मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघात एक बदल करण्यात आला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो आयपीएल २०२० मध्ये दुखापतग्रस्त झाल्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याच्या जागी वेगवान गोलंदाज रोमारियो शेफर्डला संघात सामील केले आहे.
शेफर्डने कॅरिबियिन प्रीमियर लीग २०२० मध्ये गयाना अमेझॉन वॉरिअर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या संघाने सीपीएलमध्ये उपांत्य सामन्यापर्यंत मजल मारली होती.
विशेष म्हणजे युएईत सुरू असलेल्या आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना ब्रावो दुखापतग्रस्त झाला होता. तो ग्रोईन (मांडीच्या) दुखापतीने ग्रस्त आहे. त्याला बरे होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो. त्यामुळे त्याच्या जागी शेफर्डला संघात स्थान देण्यात आले आहे.
🚨 TEAM NEWS 🚨
Romario Shepherd has replaced the injured Dwayne Bravo for West Indies tour of New Zealand.
The two teams are scheduled to play three T20Is and two Tests, starting 27 November.
What do you make of this move?#NZvWI pic.twitter.com/rHKavwl4Ic
— ICC (@ICC) October 22, 2020
शेफर्डने २०१९ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. सोबतच या वर्षी जानेवारीमध्ये त्याने आयर्लंडविरुद्ध आपले टी२० पदार्पण केले होते. वेस्ट इंडिजचा संघ पुढील महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ३ सामन्यांची टी२० मालिका आणि २ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. मालिकेची सुरुवात टी२० सामन्याने २७ नोव्हेंबरपासून होणार आहे.
ब्रावोच्या जागी वेस्ट इंडिज संघात सामील झालेला खेळाडू शेफर्ड म्हणाला, “हे माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. मी मागील वर्षी संघात होतो आणि यावर्षाच्या सुरुवातीलाही संघाचा भाग होतो. त्यामुळे मला या स्तराचा अंदाज आहे. मी खूप मेहनत घेत आहे. आणि आपल्या खेळावर काम करत आहे. त्यामुळे मी पूर्णपण तयार आहे.”
सीपीएलमध्ये शेफर्डने अमेझॉन वॉरिअर्सकडून खेळताना एकूण ६ विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. यादरम्यान त्याचा इकोनॉमी रेट ७.३१ होता.
महत्त्वाच्या बातम्या –
-IPL 2020 Playoff: बेंगलोरच्या विजयाने केल्या चेन्नईच्या आशा पल्लवित; आता एका जागेसाठी ५ दावेदार
-सीएसकेला दूसऱ्या ड्वेन ब्रावोचा शोध, ‘ही’ ३ नावं आहेत चर्चेत
-‘एक तर तुम्ही जिंकता किंवा काहीतरी शिकता,’ दिग्गजाने केली धोनीची प्रशंसा
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज
-आयपीएलमध्ये पहिले शतक झळकवण्यासाठी सर्वाधिक डाव खेळलेले ३ भारतीय फलंदाज
-आयपीएलमध्ये सलग चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज