fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

महान क्रिकेटर म्हणतोय, विराट- रोहितपैकी ‘हा’ खेळाडू करणार टी२०मध्ये द्विशतक

Dwayne Bravo says Rohit Sharma Can Hit First T20 Double Ton

नवी दिल्ली । वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा कारनामा आतापर्यंत ६ फलंदाजांनी केला आहे. परंतु आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एकाही खेळाडूला द्विशतक करता आलेले नाही. असे असले तरी वेस्ट इंडीज आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोने त्या खेळाडूबद्दल सांगितले आहे जो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये द्विशतक करू शकतो.

रोहित शर्मा करू शकतो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये द्विशतक-

चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) अष्टपैलू क्रिकेटपटू ब्रावोने (Dwane Bravo) ईएसपीएन क्रिकइंफोच्या २५ प्रश्नांच्या कार्यक्रमात  भाग घेतला होता. यामध्ये त्याने अनेक गोष्टींबद्दल चर्चा केली. परंतु त्याला विचारण्यात आले की असा कोणता फलंदाज आहे जो टी२० क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक करू शकतो? यावर ब्रावोने प्रत्युत्तर देत भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माची निवड केली.

खरंतर रोहित सध्याचा मर्यादित षटकांमधील विस्फोटक फलंदाज आहे. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत ४ शतके ठोकली आहेत. त्याने २०१७मध्ये श्रीलंकेविरुद्ध ४३ चेंडूत ११८ धावांची शतकी खेळी केली होती. ही क्रिकेटच्या सर्वात छोट्या क्रिकेट प्रकारातील रोहितची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

वनडे क्रिकेटमध्ये ठोकले आहेत ३ द्विशतक-

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहितने (Rohit Sharma) आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये ३ द्विशतके करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. खरंतर २०१३मध्ये जेव्हा रोहितने सलामीला फलंदाजी करण्याची जबाबदारी स्विकारली, त्यानंतर त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे.

जागतिक क्रिकेटमध्ये ‘हिट मॅन’ (Hit Man) नावाने प्रसिद्ध असलेल्या रोहितने २०१३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्यात २०९ धावांची खेळी केली होती. त्यानंतर २०१४मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात २६४ धावांची खेळी केली होती. ही वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या होती. यानंतर ३ वर्षांनी २०१७मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्धच २०८ धावांची खेळी केली होती. विशेष म्हणजे हे तिन्ही द्विशतक त्याने भारतात खेळताना केले होते.

याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये अनेक फलंदाजांना शतकी खेळी करता आलेली नाही. आतापर्यंत टी२०त सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या ही ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार ऍरॉन फिंचच्या (Aaron Finch) नावावर आहे. त्याने २०१८मध्ये झिंबाब्वेविरुद्धच्या टी२० सामन्यात ७६ चेंडूत १७२ धावा केल्या होत्या. त्यात १० षटकार आणि १६ चौकारांचा समावेश आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-८ वर्षांपुर्वीच्या डेक्कन चार्जर्स व सध्याच्या सनराइजर्स हैद्राबादमधील ५ गमतीशीर साम्य

-…तर गोलंदाजांना मास्क लावून खेळवावे

-सप्टेंबरमध्ये आयपीएल झालीच तर हा एकमेव देश आहे आयोजनसाठी पर्याय

You might also like