---Advertisement---

सीएसके प्रशिक्षकाचे मैदानात पुनरागमन! धोनीचा सहकाऱ्याने नाईट रायडर्स फ्रँचायझीसोबत मिळवला हात

MS Dhoni Dwayne Bravo
---Advertisement---

सध्या इंडियन प्रीमियर लीगची चर्चा जगभरात सुरू आहे. आयपीएल 2023 हंगाम शेवटच्या टप्यात असून संघ प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. अशातच त्यांचा माजी अष्टपैलू ड्वेन ब्रावो क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार असल्याचे समोर येत आहे.

होय चेन्नई सुपर किंग्जचा माजी अष्टपैलू आणि सध्या सीएसकेच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत असलेला ब्रालो पुन्हा खेळताना दिसणार आहे. पण फरक फक्त इतकाच आहे की, ब्रावो सीएसके नाही, तर शाहरुख खानच्या मालकिच्या नाईट रायडर्स फ्रँचायझीसाठी खेळताना दिसेल. होय शाहरूखच्या नाईट रायडर्स फ्रँचायझीने जगभरातील टी-20 लीगमध्ये संघ खरेदी केले आहेत. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्येही नाईट रायडर्सचा संघ आहे. सीपीएलमधील ट्रिनबागो नाईट रायडर्स संघासाठी ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) पुनरगामन करतणाह आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ब्रालोने एक पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली.

मागच्या वर्षी ब्रावोने आवला शेवटचा आयपीएल हंगाम खेळला. यामध्ये थ्याने सीएशकेसाठी 10 सामन्यांमध्ये अवघ्या 23 धावा केल्या. पण गोलंदाजीत चामकदार कामगिरी करत 16 विकेट्स मिळवल्या होत्या. ही स्पर्धा संपल्यानंतर त्याने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, कॅरेबियन प्रीमियर लीग म्हणजेच सीएसमध्ये ब्रालो अजूनही खेळत आहे. सीपीएलचा आगामी हंगाम यावर्षी ऑगस्टमध्ये खेळवला जाणार आहे. ब्रावो यावेळी ट्रिनबागो नाईट रायडर्ससाठी पुनरागमन करेल.

https://www.instagram.com/reel/CsWNPduh22k/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MTIyMzRjYmRlZg==

यापूर्वी सीपीएल 2013 ते 2020 मध्ये ब्रावो ट्रिनबागो नाईट रायडर्सचा भाग होता. त्याने या संघाला चार वेळा विजेतेपदगी मिळवून दिले. मागच्या दोन हंगामांमध्ये मात्र ब्रालो सीपीएलमध्ये सेंट किंट्स ऍन्ड नेविस संघासाठी खेळला. यावर्षी तो पुन्हा ट्रिनबागो संघाशी जोडला गेला आहे. आयपीएलमध्ये त्याच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर सीएसकेसाठी तो नेहमीच मॅच विनर ठरला. त्याने 2011 साली सीएसकेत प्रवेश केला आणि शेवटचा हंगाम देखील याच संघासाठी खेळला. आयपीएलमध्ये ब्रावोने 161 सामन्यांमध्ये एकूण 1560 धावा केल्या आहेत. गोंलंदाजाच्या रूपात त्याने 183 विकेट्स नावावर केल्या. (Dwayne Bravo will play for Trinbago Knight Riders in the CPL this year)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘जवळच्या आणि प्रिय लोकांनीही साथ सोडली’, निवड समितीचे अध्यक्षपद गेल्यानंतर चेतेश शर्मा अडचणीत
भारत-पाकिस्तानमध्ये होणार कसोटी मालिका? पीसीबीच्या प्रस्तावावर बीसीसीआयने दिली प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---