पुणे | ई2डी स्पोर्ट्स यांच्या तर्फे ई2डी कॉर्पोरेट क्रिकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत एलेनो एनर्जी, सॉफ्टहार्ड ऑटोमेशन या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
लवळे येथील ई2डी क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सलामीच्या सामन्यात हनुमंत गाडे((3-22) व नाबाद 32धावा)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एलेनो एनर्जी संघाने इनव्हेंटीज इंडिया संघाचा 65धावांनी पराभव करत शानदार सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना हनुमंत गाडे नाबाद 32(33), रत्नदीप लोंढे 25(20), संदीप गरड 17(22)यांनी केलेल्या धावांच्या जोरावर एलेनो एनर्जी संघाने 20षटकात 9बाद 138धावा केल्या. याच्या उत्तरात इनव्हेंटीज इंडिया संघाचा डाव14षटकात 73धावावर संपुष्टात आला. किरण दातारने सर्वाधिक 33धावा केल्या. एलेनो एनर्जीकडून चेतन चव्हाणने 8धावांत 4गडी, हनुमंत गाडेने 22धावांत 3गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर हनुमंत गाडे ठरला.
दुसऱ्या ब गटाच्या साखळी सामन्यात केतन पासलकर(8-5)याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने एएफके संघावर 114 धावांनी दणदणीत विजय मिळवला. सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने 20षटकात 3बाद 156धावा केल्या. यात अजित गव्हाणे 57(50), प्रफुल मानकर नाबाद 49(41), कुमार ठक्कर 17यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना एएफके संघ 13.5षटकात 42धावावर संपुष्टात आला. अजिंक्य आखाडे 20(21), प्रशांत डांगे नाबाद 12(30),यांनी थोडासा प्रतिकार केला. सॉफ्टहार्ड ऑटोमेशनकडून केतन पासलकरने 8धावांत 5गडी बाद करून एएफकेचा निम्मा संघ तंबूत परत पाठवला. केतनला स्वप्निल चिखलेने 6धावांत3गडी, अमित गनपुलेने11धावात1गडी बाद करून सुरेख साथ दिली. सामनावीर केतन पासलकर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पूल अ: एलेनो एनर्जी: 20षटकात 9बाद 138धावा(हनुमंत गाडे नाबाद 32(33), रत्नदीप लोंढे 25(20), संदीप गरड 17(22), सौरभ गुजर 4-22-4, करण चितापुरे 4-21-2, प्रतीक लवळेकर 4-22-2)वि.वि.इनव्हेंटीज इंडिया: 14षटकात सर्वबाद 73धावा(किरण दातार 33(32), मयूर राजपूत 10(15), चेतन चव्हाण 3-8-4, हनुमंत गाडे 3-22-3, प्रवीण पाटील 2-14-1, अभिजित चव्हाण 2-17-1);सामनावीर-हनुमंत गाडे; एलेनो एनर्जी 65धावांनी विजयी;
पूल ब: सॉफ्टहार्ड ऑटोमेशन: 20षटकात 3बाद 156धावा(अजित गव्हाणे 57(50), प्रफुल मानकर नाबाद 49(41), कुमार ठक्कर 17(22), ताराप्रकाश मौर्य 4-36-1, अजय कोकाटे 4-27-1, अजिंक्य आखाडे 4-33-1)वि.वि.एएफके: 13.5षटकात सर्वबाद 42धावा(अजिंक्य आखाडे 20(21), प्रशांत डांगे नाबाद 12(30), केतन पासलकर 4-8-5, स्वप्निल चिखले 3-6-3, अमित गनपुले 3-11-1); सामनावीर-केतन पासलकर; सॉफ्टहार्ड ऑटोमेशन 114धावांनी विजयी.