भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने नेहमीच रोमांचक होत असतात. उभय संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये खेळताना दिसतात. मात्र, मागील जवळपास 15 वर्षांपासून या दोन्ही देशांदरम्यान कोणतीही कसोटी मालिका खेळली गेली नाही. मात्र, आता चाहत्यांना पुन्हा एकदा भारत पाकिस्तान कसोटीची पर्वणी मिळू शकते. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या कसोटी सामन्याचे यजमानपद भूषवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष मार्टिन डार्लो यांनी नुकतीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये सध्या सात सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. ईसीबी भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान इंग्लंडमध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे तटस्थ आयोजक म्हणून यजमानपद भूषवण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटले. ही मालिका इंग्लंडमध्ये राहणाऱ्या आशियाई लोकांना आकर्षित करू शकते असे त्यांचे मत आहे. तसेच यामुळे क्रिकेटच्या लोकप्रिय तिथेही वाढ होईल असे त्यांनी म्हटले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांचे क्रिकेटप्रेमींना नेहमीच आकर्षण असते. मात्र, दोन्ही देशातील राजकीय संबंधांमुळे द्विपक्षीय मालिका आयोजित केल्या जात नाहीत. दोन्ही देशात अखेरच्या वेळी 2013 मध्ये भारतात मर्यादित षटकांच्या मालिका झालेल्या. तेव्हापासून दोन्ही देश केवळ आयसीसी विश्वचषक व आशिया चषकात एकमेकांशी भिडतात. जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्येही 2008 नंतर पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्यासाठी परवानगी दिली गेलेली नाही. 2007 मध्ये दोन्ही देशांद दरम्यान अखेरची कसोटी मालिका खेळली गेलेली. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघाने 1-0 असा विजय संपादन केला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंड ए विरुद्ध संजू सॅमसनची ‘कॅप्टन्स इनिंग’;तिलक, शार्दुलचीही चमकदार फलंदाजी
अर्जुन तेंडुलकरचा युवराज सिंगच्या वडीलांसोबत भांगडा डान्स, व्हिडीओ व्हायरल
असा भारतीय क्रिकेटर ज्याला चक्क पाकिस्तानच्या मुलींनी केले होते प्रपोज