पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या वतीने १९ वर्षांखालील मुलांसाठी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा सोमवार, ३० ऑगस्ट पासून ८ सप्टेंबर पर्यंत रंगणार आहे, अशी माहिती इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष व स्पर्धेचे संचालक दर्शन जिंदल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यावेळी इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सचिव सयन सेनगुप्ता, संचालक महेश देशमुख, प्रत्यूष भारतीय, लायन क्लब ऑफ पुणे, मास्टरमाईंडच्या अध्यक्षा नसरीन एंजलर, अंशुल शर्मा, पोरस अगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
जिंदल पुढे म्हणाले, विजेत्या संघास व्ही. के. जिंदल स्मृती करंडक तर उपविजेत्या संघास पं. शिवदत्त शास्त्री स्मृती करंडक देवून गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत पीवायसी, डेक्कन जिमखाना, पूना क्लब, डीव्हीसीए, ब्रिलियंट, अँबिशियस, केडनस, २२ यार्ड्स, मेट्रो व जिल्हा संघ असे १० संघ सहभागी होणार असून ही स्पर्धा राऊंड रॉबिन प्रकारात होणार आहे. ही स्पर्धा पुना क्लब, येवलेवाडी, पीवायसी, डेक्कन जिमखाना, डीव्हीसीए, बारणे या ठिकाणी होणार आहे. अशी माहिती सयन सेनगुप्ता यांनी दिली.
स्पर्धेला अंकार पानासोनिक लाईफ सोल्युशन, सेव्हन बाय एमएस धोनी, लायन क्लब ऑफ पुणे, मास्टरमाईंड आदींचे सहकार्य लाभले असून गुणवत्ता असणाऱ्या खेळाडूना याद्वारे व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सामनावीर, मालिकावीर, सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज अशी विविध पारितोषिके सेव्हन बाय एमएस धोनी संस्थेच्या वतीने देण्यात येनार आहेत, अशी माहिती महेश देशमुख यांनी दिली.