Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पेरीने रचला विश्वविक्रम! WPL मध्ये टाकला महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू

March 16, 2023
in WPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/WPL

Photo Courtesy: Twitter/WPL


वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये बुधवारी (15 मार्च) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध युपी वॉरियर्झ असा सामना खेळला गेला. स्पर्धेतील आपला पहिला विजय शोधत असलेल्या आरसीबी संघाने या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. युपीला पाच विकेट्सने पराभूत करत त्यांनी आपल्या गुणांचे खाते उघडले. त्याचवेळी या सामन्यात आरसीबीसाठी खेळणारी ऑस्ट्रेलियाची दिग्गज अष्टपैलू एलिस पेरी हिने महिला क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम नोंदवला.

महिला क्रिकेटमधील मान्यवर अष्टपैलू असलेली पेरी या सामन्यात शानदार गोलंदाजी करताना दिसली. स्पर्धेतील पहिल्या पाच सामन्यात तीला एकही बळी मिळवता आला नव्हता. मात्र, या सामन्यात तिने तीन बळी आपल्या नावे केले. तिने आपल्या चार षटकात केवळ 16 धावा देताना ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा व श्वेता सेहरावत यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याचवेळी तिने वुमेन्स प्रिमियर लीग तसेच महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू देखील टाकला. तीने या सामन्यात 130.5 किमी/प्रतितास इतक्या वेगाने चेंडू टाकल्याचे सांगितले जात आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी, सोशल मीडियावरून हा दावा केला गेला आहे.

Ellyse Perry yesterday clocked 130.5kmph – probably the fastest ball in women's T20 cricket. pic.twitter.com/dcOEZenVNH

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 16, 2023

 

महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेची शबनीम इस्माईल हिच्या नावे आहे. तिने काही दिवसांपूर्वी झालेल्या महिला टी20 विश्वचषकात 128 किमी/प्रतितास इतक्या वेगाने चेंडू टाकला होता. त्यानंतर हा विक्रम मोडणे जवळपास अशक्य असल्याचे सांगितले जात होते.

मागील काही काळापासून स्पीडोमीटरमध्ये सातत्याने गडबड होत असल्याचे दिसते. इंग्लंडची वेगवान गोलंदाज लॉरेन बेल हिचा चेंडू थेट 173 किमी प्रतितास इतक्या वेगाचा दाखवला गेला होता.

(Ellyse Perry Bowl 130 KMPH Ball For RCB In WPL 2023 Break Shabnim Ismail Record)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीप्रेमींसाठी रैनाने दिली आनंदाची बातमी, आयपीएल 2024मध्येही खेळणार थाला?
’15 वर्षात एकही ट्रॉफी जिंकली नाही…’, विराटशी संवाद केल्यानंतर महिला आरसीबीने जिंकला पहिला सामना


Next Post
Umran-Malik-Hardik-Pandya

IND vs AUS 1st ODI । दिग्गजाने निवडली संभावित प्लेइंग इलेव्हन, प्रमुख खेळाडू संघातून बाहेर

Babar Azam

बाबर म्हणतोय, "आयपीएल नव्हेतर बिग बॅश सर्वोत्तम", चाहत्यांनी घेतला चांगलाच समाचार

Photo Courtesy: Twitter/@ICC

शोएब अख्तरचे 'हे' विधान चर्चेत, जाणून घ्या आधार कार्डविषयी काय म्हणाला पाकिस्तानी दिग्गज

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143