दुबई। चेन्नई सुपर किंग्स संघाने इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचे विजेतेपद मिळवले आहे. शुक्रवारी(१५ ऑक्टोबर) पार पडलेल्या अंतिम सामन्यात त्यांनी ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेला हा सामना चेन्नईने २७ धावांनी जिंकला आणि चौथ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. चेन्नई संघासाठी सर्वाधिक योगदान दिलं ते २४ वर्षीय ऋतुराज गायकवाडने. त्यामुळे यंदाचा सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा म्हणजेच ‘एमर्जिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कार मिळाला.
हा पुरस्कार देण्यासाठी बीसीसीआयचे काही नियम आहेत. हा पुरस्कार त्याच खेळाडूंना दिला जातो, ज्यांचा जन्म १ एप्रिल १९९४ नंतर झाला आहे. तसेच त्या खेळाडून ५ किंवा त्यापेक्षा कमी कसोटी सामने किंवा २० किंवा त्यापेक्षा कमी वनडे सामने खेळलेले आहेत. तसेच त्या खेळाडूने २५ किंवा त्यापेक्षा कमी आयपीएल सामने खेळलेले असतील. तसेच त्या खेळाडूने आधी हा पुरस्कार मिळवलेला नसेल.
यंदाच्या हंगामात हा पुरस्कार मिळणाऱ्या ऋतुराजने प्रभावी कामगिरी केली. त्याने १६ सामन्यांत ४५.३५ च्या सरासरीने ६३५ धावा केल्या. यामध्ये १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे.
या लेखातून आपण आत्तापर्यंतचे एमर्जिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट जिंकणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.
आत्तापर्यंतचे एमर्जिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट जिंकणारे खेळाडू –
२००८ – श्रीवत्स गोस्वामी (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
२००९ – रोहित शर्मा (डेक्कन चार्जर्स)
२०१० – सौरभ तिवारी (मुंबई इंडियन्स)
२०११ – इक्बाल अब्दुल्ला (कोलकाता नाईट रायडर्स)
२०१२ – मनदीप सिंग (किंग्स इलेव्हन पंजाब)
२०१३ – संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स)
२०१४ – अक्षर पटेल (किंग्स इलेव्हन पंजाब)
२०१५ – श्रेयस अय्यर (दिल्ली डेअरडेविल्स)
२०१६ – मुस्तफिजूर रेहमान (सनरायझर्स हैदराबाद)
२०१७ – बासिल थंपी (गुजरात लायन्स)
२०१८ – रिषभ पंत (दिल्ली डेअरडेविल्स)
२०१९ – शुबमन गिल (कोलकाता नाईट रायडर्स)
२०२० – देवदत्त पडीक्कल (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
२०२१ – ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्स)
महत्त्वाच्या बातम्या –
बस नाम ही काफी है! ‘या’ खेळाडूकडून एमएस धोनीचे कौतुक, सीएसकेवरही होतोय शुभेच्छांचा वर्षाव
IPL 2021: राजस्थान रॉयल्सने यंदा ‘फेअरप्ले अवॉर्ड’वर कोरले नाव; पाहा आजपर्यंतचे विजेते संघ