इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्राॅडने दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून मागार घेतली आहे. तो मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला असून त्यात त्याचे प्रदर्शन काही खास नव्हते. त्याने त्या सामन्यात केवळ एक विकेट घेतली होता. पण त्यानंतर तो दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडला. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत झाला असून दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. इंग्लंडचा संघ ०-१ ने मालिकेत पिछाडीवर आहे.
इंग्लंडचा दुखापतग्रस्त गोलंदाज स्टुअर्ट ब्राॅडने समाजमाध्यमावर त्याचा एक फोटो शेयर केला आहे. या फोटोत तो व्हिलचेयरवर बसलेला दिसत आहे. फोटोत त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य जसेच्या तसे आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळलेल्या स्टुअर्ट ब्राॅडला लाॅर्ड्स कसोटी सामन्याच्या आधी सराव करताना दुखापत झाली होती. त्याला सरावादरम्यान नडगीला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो पूर्ण मालिकेतून बाहेर गेला.
या मालिकेतून बाहेर पडल्याने ब्रॉडसाठी त्याचा १५० वा कसोटी सामना खेळण्याची प्रतिक्षा आणखी लांबली आहे. भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना ब्रॉडसाठी कारकिर्दीतील १४९ वा कसोटी सामना होता. त्यानंतर तो लॉर्ड्सवर १५० वा कसोटी सामना खेळणार होता. मात्र, त्यापूर्वी दुखापतीने त्याला घेरल्याने आता त्याला या क्षणाची आणखी वाट पाहावी लागणार आहे.
https://www.instagram.com/p/CSyd_VoMJFM/
त्याच्याव्यतिरिक्त दुसरे अनेक गोलंदाजही दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकले नाहीत, यामध्ये क्रिस वोक्स, ऑली स्टोन यांचा समावेश आहे. लाॅर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ १५१ धावांनी पराभूत झाला. या सामन्यात इंग्लंडची गोलंदाजी कमजोर दिसली. मालिकेतील तिसरा सामना २५ ऑगस्टपासून लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
या दोन खेळाडूंना मिळू शकते इंग्लंड संघात खेळण्याची संधी
दुसरा सामना हरल्यानंतर इंग्लंड संघाने तिसऱ्या सामन्यासाठी तीन बदल केले आहेत. त्यामुळे डेविड मलान तिसऱ्या सामन्यात खेळू शकतो असा अंदाज बांधला जात आहे. तो मागच्या तीन वर्षापासून कसोटी क्रिकेटपासून लांब आहे. मात्र, मागच्या काही दिवसात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा इंग्लंड संघात संधी मिळाली. गोलंदाज मार्क वुडही दुखापतग्रस्त आहे. जर तो तिसऱ्या सामन्याआधी ठीक झाला नाही, तर त्याची संघातील जागा युवा गोलंदाज साकिब महमुदला दिली जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
“… म्हणून मला लॉर्ड्स कसोटीत संधी मिळाली नाही”, स्वतः अश्विनने केला खुलासा