---Advertisement---

चिन्नास्वामीवर इंग्लंडची फलंदाजी उद्ध्वस्त! अवघ्या ‘इतक्या’ धावांवर गमावल्या पहिल्या सात विकेट्स

Jos Buttler
---Advertisement---

इंग्लंड आणि श्रीलंका संघ विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी (26 ऑक्टोबर) आमने सामने आले. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेला. सलामीवीर जोडीने संघाला समाधानकारक सुरुवात दिली. पण पहिल्या विकेटनंतर पुढच्या 20 षटकांमध्ये इंग्लंड संघ चांगलाच अडचणीत आला. त्यांच्या पहिल्या सात विकेट्स खूपच स्वस्तात गेल्या.

जॉनी बेअरस्टो आणि डेविड मलान यांनी इंग्लंडसाठी डावाची सुरुवात चांगल्या पद्धतीने किली. पण संघाची धावसंख्या 45 असताना सातव्या षटकात मलान वैयक्तिक 28 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या जो रुटने अवघ्या 3 धावा करून दहाव्या षटकात विकेट गमावली. संघाला तिसरा झटका बसला तो सलामीवीर जॉनी बेअरस्टो याच्या रुपात. यष्टीरक्षक फलंदाजाने वैयक्तिक 30 धावा करून चौदाव्या षटकात विकेट गमावली. चौथ्या क्रमांकावर खेळताना बेन स्टोक्स याने महत्वपूर्ण खेळी केली. पण कर्णधार जोस बटलर जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही.

बटलरने 6 चेंडूत 8 धावा केल्यानंतर डावातील 15व्या षटकात विकेट सोडली. पाचवी विकेट लियाम लिविंगस्टोन याने गमावली. लिविंगस्टोन डावातील 17व्या षटकात फक्त 1 धाव केल्यानंतर बाद झाला. मोईन अली यानेही 15 धावांची खेळी करून विकेट गमावली. ख्रिस वोक्स शुन्यावर बाद झाला असून संघासाठी हा सातवा झटका होता. इंग्लंडची धावसंख्या 127 असताना या सात महत्वाच्या विकेट्स पडल्या.

दरम्यान, इंग्लंड संघ मागच्या बऱ्याच दिवसांपासून फॉर्ममध्ये दिसला नाहीये. विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या चार सामन्यांपैकी फक्त एक सामना त्यांना जिंकता आला आहे. तसेच गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध देखील त्यांचे फलंदाज अपेक्षेनुसार खेळताना दिसले नाहीत.

(ENG vs SL England are in deep trouble. Lost their 7th Wicket at 123.)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन – 
इंग्लंड – जॉनी बेअरस्टो, डेविड मालन, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वूड

श्रीलंका – पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (कर्णधार/यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महीश थीक्षणा, कसून राजिथा, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका

महत्वाच्या बातम्या – 
भारतात नाही, तर ‘या’ देशात होणार IPL 2024चा लिलाव? तारखांबाबत मोठी अपडेट आली समोर
‘देवा अशी बायको सर्वांना दे…’, धवनने ‘त्या’ महिलेविषयी साधला संवाद; व्हिडिओ तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---