कधीकधी संघ खूप चांगले असतात. परंतु काहीवेळा चांगल्या युवा खेळाडूंच्या जागी सर्वोत्कृष्ट खेळाडूंना संघात स्थान मिळते. असेही कधी घडते की कोणत्या महत्वाच्या क्रमांकावर एक सर्वोत्तम खेळाडू फिट होतो. ज्यामुळे त्याच्या जागी दुसऱ्या कोणत्या खेळाडूला खेळवण्याचा विचारही करू शकत नाही. यावेळी काही अशीच परिस्थिती इंग्लंड क्रिकेट संघाची आहे.
ओल्ड ट्रॅफर्ड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात सॅम बिलिंग्जने इंग्लंडकडून अविश्वसनीय खेळी खेळली आहे. २९५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने ५७ धावांवर ४ महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बिलिंग्ज मैदानात उतरला. तर दुसऱ्या बाजूने जॉनी बेयरस्टो संघाच्या विजयासाठी संघर्ष करत होता. त्यावेळी असं वाटत होतं की हे आता अवघड आहे.
परंतु बिलिंग्ज आणि बेअरस्टो त्या अवस्थेतून संघाला बाहेर काढण्यात यशस्वी झाले. इंग्लंडला खात्री पटली की त्यांना जिंकता येईल. बिलिंग्ज शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहीला. त्याने शतकीय(११८) खेळी खेळत सामना अंतिम षटकापर्यंत नेहला. परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आणि त्यांना १९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. परंतु बिलिंग्जने संघात मधल्या फळीतील स्थानासाठी आपल्या नावाचा विचार करण्यास संघाला भाग पाडले आहे.
शतक करूनही बिलिंग्जने कबूल केले की अद्याप पाचव्या क्रमांकावर फलंदाज म्हणून आपली जागा निश्चित करता येणार नाही. कारण या क्रमांकावर बेन स्टोक्स खेळत आहे. जो संघाचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध दुसर्या वनडे सामन्याआधी त्याने हे विधान केले आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेत बेन स्टोक्स संघात नाही. कारण हा अष्टपैलू त्याच्या कुटुंबासमवेत न्यूझीलंडमध्ये आहे.
“बेन स्टोक्स येथे नाही आणि मला असं वाटत नाही की मी कितीही धावा केल्या तरी मी संघात कायम स्थान मिळवू शकतो. मी फक्त एक गोष्ट करू शकतो की माझ्या चांगल्या खेळीने मी संघाचा दरवाजा वाजवत राहील. विशेषत: टी२० साठी खालच्या क्रमांकावर एक जागा आहे. त्याजागी माझा विचार केला जाऊ शकतो,” असंही तो शेवटी म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएल२०२० साठी राजस्थान रॉयल्सने ‘या’ दिग्गजाकडे दिली मोठी जबाबदारी
-खेळाडू आपले खरे वय का लपवतात? सेहवागने सांगितले कारण
-चेन्नई सुपर किंग्स मधील ‘या’ खेळाडूची पुन्हा होणार कोरोना चाचणी
ट्रेंडिंग लेख-
-सीपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणारे हे ५ खेळाडू आयपीएलमध्येही धमाका करण्यास सज्ज