Loading...

१४२ वर्षांच्या इतिहासात असा पराक्रम करणारा इंग्लंड पहिलाच संघ

पोर्ट एलिझाबेथ। आजपासून(16 जानेवारी) दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ येथे सुरु असलेला हा सामना इंग्लंड संघासाठी खास आहे. कारण हा त्यांचा परदेशातील 500 वा कसोटी सामना आहे.

Loading...

त्यामुळे परदेशात 500 कसोटी सामने खेळणारा इंग्लंड पहिलाच संघ ठरला आहे. इंग्लंडने याआधी परदेशात खेळलेल्या 499 कसोटी सामन्यांमधील 149 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 182 सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच 168 सामने अनिर्णित राहिले आहेत.

इंग्लंडने परदेशातील पहिला सामना 15 ते 19 मार्च 1877 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न येथे खेळला होता.

इंग्लंड पाठोपाठ परदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाने 404 कसोटी सामने परदेशात खेळले आहेत.

Loading...

परदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे संघ – 

500 सामने – इंग्लंड

404 सामने – ऑस्ट्रेलिया

Loading...
Loading...

295 सामने – वेस्ट इंडिज

274 सामने – पाकिस्तान

268 सामने – भारत

You might also like
Loading...