चेन्नई येथील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याने इंग्लंडच्या भारत दौऱ्याला सुरुवात झाली आहे. पहिलाच कसोटी सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील आता ३ कसोटी सामने बाकी आहेत. यानंतर लगेचच टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे. यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ऑयन मॉर्गनकडे नेतृत्त्व कायम ठेवताना दोन राखीव खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आले आहे.
या सोळा सदस्यीय संघात मोईन अली, जॉनी बेयरस्टो, जोश बटलर, आदिल राशिद, जेसन रॉय व बेन स्टोक्ससारख्या अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
या मालिकेत एकूण ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. तिसरा (२४ फेब्रुवारी) व चौथा कसोटी (४ मार्च) सामना सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद येथेच होणार आहे. त्यानंतर सात दिवसांच्या विश्रांतीनंतर येथेच टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे. सर्वच्या सर्व टी२० सामने याच मैदानावर होणार आहेत. तसेच सर्व सामन्यांच्या वेळा देखील सायंकाळी ७ वाजता आहे.
मालिकेतील पहिला टी२० सामना १२ मार्च, दुसरा १४ मार्च, तिसरा १६ मार्च, चौथा १८ मार्च व शेवटचा सामना २० मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर दोन्ही संघ वनडे मालिकेसाठी पुण्याला रवाना होतील. पुण्यात वनडे मालिकेतील तीनपैकी तीन वनडे सामने खेळवले जाणार आहेत. ऑयन मॉर्गन नेतृत्त्व करत असलेला हा संघ २६ फेब्रुवारी रोजी इंग्लडहून अहमदाबादला रवाना होणार आहे.
भारताविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी असा आहे इंग्लंडचा संघ-
ऑयन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल, मार्क वुड
राखीव खेळाडू– जॅक बॉल व मॅट पार्किंगसन
England have named a 16-member squad for the five-match #INDvENG T20I series, starting 12 March. pic.twitter.com/xA6Oz99lqB
— ICC (@ICC) February 11, 2021
भारत विरुद्ध इंग्लंड टी२० मालिकेचे वेळापत्रक
पहिली टी२०- १२ मार्च- सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद, वेळ- सायं.- ७.०० वा
दुसरी टी२०- १४ मार्च- सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद, वेळ- सायं.- ७.०० वा
तिसरी टी२०- १६ मार्च- सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद, वेळ- सायं.- ७.०० वा
चौथी टी२०- १८ मार्च- सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद, वेळ- सायं.- ७.०० वा
पाचवी टी२०- २० मार्च- सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद, वेळ- सायं.- ७.०० वा
महत्त्वाच्या बातम्या-