आजपासून ठीक १० वर्षांपुर्वी इंग्लंड क्रिकेट संघाचे कित्येक दशक जुने स्वप्न पूर्ण झाले होते. कारण जरी इंग्लंडला क्रिकेटचे जनक म्हटले जात असले तरी इंग्लंड संघाने २०१० पर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नव्हती.
दुर्दैवाने २०१०पुर्वी इंग्लंड संघ ३वेळा वनडे विश्वचषकाच्या आणि एक वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचूनही जिंकू शकला नव्हता. त्यामुळे जगातील सर्वोत्कृष्ट संघ असणाऱ्या इंग्लंडला एक तरी आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची आवश्यकता होती.
पण, अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवसाची इंग्लंड क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेटचे चाहते खूप आतुरतेने वाट पाहत होते. तो दिवस होता १६ मे २०१०. इंग्लंड संघ या दिवशी पॉल कॉलिंगवूड याच्या नेतृत्वाखाली टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. England cricket team wins icc t20 world cup 2010 on 16 may.
त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करत इंग्लंडला नवा इतिहास रचण्याची संधी होती आणि तसेच झालेही. इंग्लंडचा गोलंदाज रायन साइडबॉटम याच्या शानदार गोलंदाजीमुळे आणि फलंदाज क्रेग कीसवेटर याच्या दमदार फलंदाजीमुळे इंग्लंडने १८ चेंडू राखून ७ विकेट्सने अविस्मरणीय विजय मिळवला होता. यासह इंग्लंडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व स्वरुपांमध्ये पहिली आयसीसी ट्रॉफी भूषवली होती.
इंग्लंडच्या या विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. गतवर्षी (२०१९) इंग्लंडने वनडे विश्वचषकही आपल्या नावावर केला आहे. फक्त आता त्यांना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवायची राहिली आहे. परंतु आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जागी दर दोन वर्षांनी टी२० विश्वचषक घेण्याचे ठरविल्यामुळे त्यांचे स्वप्न मात्र अधुरेच राहणार आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
आयसीसीने घेतली शोएब अख्तरची फिरकी, वैतागलेल्या अख्तरनेही भरला आयसीसीला दम
टी२० विश्वचषकाबद्दल आहे मोठी बातमी, आता होणार या वेळी स्पर्धेचे आयोजन!
फक्त महाराष्ट्रीय खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची वनडे ड्रीम ११