fbpx
Saturday, April 10, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विराटशी तुलना करणे सोडा, मी तर त्याच्या आसपासही नाही…

England Dawid Malan on Comparison with Virat Kohli I Do Not Think I And Anywhere Near To Him

September 9, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलानने मागील काही काळात आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यानंतर आता काही लोक मलानची तुलना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत करत आहेत. विराट सध्याच्या काळात तिन्ही क्रिकेट प्रकारातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जातो. विराट हा असा फलंदाज आहे, ज्याची तिन्ही क्रिकेट प्रकारातील सरासरी ही ५० पेक्षाही अधिक आहे.

केवळ १६ डावांमध्ये मलानने १ शतक आणि ७ अर्धशतके ठोकली आहेत. विराटशी तुलनेबाबत मलानचा वेगळा दृष्टिकोन आहे.

ईएसपीएन क्रिकइंफोला दिलेल्या मुलाखतीत मलान म्हणाला, “जरी आकडेवारीवरून असे वाटत असते तरी, मला नाही वाटत की मी विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजांच्या आसपासही आहे. कदाचित जेव्हा मी ५० सामने खेळेल, तेव्हा माझी तुलना दिग्गज खेळाडूंशी केली जाऊ शकेल.”

विराटने ७६ आंतरराष्ट्रीय टी२० डावांमध्ये ५०.८० च्या सरासरीने २७९४ धावा केल्या आहेत. विराट आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना मलानचीही आकडेवारी चांगली आहे. त्याने ४८.७१ च्या सरासरीने आतापर्यंत ६८२ धावा केल्या आहेत.

३३ वर्षीय मलानला पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. तो पुढे बोलताना म्हणाला की, “मी ज्याप्रकारचा खेळाडू आहे, त्यावरून मला माहिती आहे की मी संघात कुठे फीट बसतो. त्यामुळे मी म्हटले होते की, जेव्हा तुम्ही मालिका खेळता, तेव्हा तुम्हाला समजते की तुम्ही काय करत आहात.”

महत्त्वाच्या बातम्या-

-आयपीएलमध्ये विराट-धोनीसारख्या भारतीय दिग्गजांनाच करावा लागणार अडचणींचा सामना; जाणून घ्या कारण

-मुंबईचा पोरगा घाबरतोय वेस्ट इंडिजच्या फलंदाजाला, म्हणतोय त्याच्याविरुद्ध मला नाही करायची गोलंदाजी

-आयपीएलमध्ये २ कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळालेला ‘हा’ खेळाडू विकायचा पाणीपुरी

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएलमध्ये झळकावणार शतक, पहा कोण आहेत ते ३ युवा भारतीय फलंदाज

-आयपीएलच्या १३ व्या मोसमात या ३ सलामीच्या जोड्या यूएईमध्ये उभारणार धावांचा डोंगर?

-३ अष्टपैलू खेळाडू जे आयपीएल २०२० मध्ये स्वतःला ‘फिनिशर’ म्हणून करु शकतात सिद्ध


Previous Post

आयपीएलमध्ये विराट-धोनीसारख्या भारतीय दिग्गजांनाच करावा लागणार अडचणींचा सामना; जाणून घ्या कारण

Next Post

‘या’ देशातील खेळाडूंसाठी आहे आनंदाची बातमी, बोर्डाने पगारात केलीय ८३ टक्के वाढ

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चांगल्या स्थितीत असताना रोहितच्या मुंबईला लोळवणारा कोण आहे हा हर्षल पटेल?

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/Twitter
IPL

तेराव्या हंगामाखेर चाहत्यांना दिलेला शब्द धोनी आज खरा करुन दाखवणार? पाहा काय होते ते वचन

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/cricket.com.au
IPL

MI की RCB, सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल जोडप्याचा पाठिंबा कोणाला? पाहा त्यांची टीम हारली का जिंकली?

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

ग्लेन मॅक्सवेलवरुन बेंगलोर आणि पंजाब आमने-सामने; रंगले ट्विटर वॉर

April 10, 2021
Photo Courtesy; Twitter/@anavin74
Covid19

‘तुम्ही पहिले मास्क घालून या’, चाहत्यांचा सोशल मीडियावर सौरव गांगुली-जय शहांना दणका

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/@IPLT20.com
IPL

कृणाल पंड्याच्या ‘सुपर थ्रो’ने आरसीबी चाहत्यांचा रोखला होता श्वास; पाहा डिविलियर्सला धावबाद केलेला तो क्षण

April 10, 2021
Next Post

'या' देशातील खेळाडूंसाठी आहे आनंदाची बातमी, बोर्डाने पगारात केलीय ८३ टक्के वाढ

श्रेयस अय्यर विराट कोहलीला मेसेज पाठवतो; या विषयावर चर्चाही करतो

उत्साह आयपीएलचा! एकवेळी दुबई जायला नकार देणारा दिग्गज आज दुबईला रवाना

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.