आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणणारा वेस्ट इंडिजचा अष्टपैलू आंद्रे रसेल सध्या संघर्ष करताना दिसत आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या रसेलला आयपीएल २०२० पासून सूर गवसलेला नाही. गतवर्षी १० सामने खेळताना त्याने अवघ्या ११७ धावा केल्या होत्या. दरम्यान त्याला एकही अर्धशतक करता आले नव्हते.
आयपीएल २०२१ च्या आतापर्यंत झालेल्या ३ सामन्यातही त्याला आपल्या प्रतिभेची छाप सोडण्याची संधी होती. परंतु तो अपयशी ठरला. आतापर्यंतच्या ३ सामन्यात त्याने फक्त ४५ धावा केल्या आहेत. आता रसेलच्या खराब फलंदाजीबद्दल इंग्लंडचा माजी कर्णदार मायकल वॉन याने मोठे वक्तव्य केले आहे.
वॉन म्हणाला की, “जेव्हा रसेल लयीत असतो, तेव्हा तो शानदार प्रदर्शन करतो. परंतु तो सहसा मैदानावर गोलंदाजी करताना संघर्ष करताना दिसतोय. सोबतच त्याला साध्या २ धावाही पळून काढता येत नाहीत. बेंगलोरविरुदधच्या सामन्यात १९ व्या षटकात त्याने २ धावा घेण्याची गरज होती. कारण यावेळी त्याने स्ट्राईक स्वत:कडे ठेवणे महत्त्वाचे होते. कोलकाताचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आणि कर्णधार ऑएन मॉर्गन यांना या पैलूंवर काम करावे लागणार आहे.”
“माझ्या मते, आधुनिक क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाकडे ९-१० असे खेळाडू हवेत, जे मैदानावर उत्स्फुर्तीने आणि चपळतेने खेळतील. परंतु सध्याच्या कोलकाता संघाकडे पाहिल्यावर असे काही जाणवत नाही,” असे वॉनने पुढे सांगितले.
खराब फॉर्म पाहता रसेलला अंतिम ११ जणांमधून वगळण्यात यावे का? असा प्रश्न विचारला असता वॉन म्हणाला की, “हे कठीण आहे. तुम्ही त्याला संघाबाहेर ठेवू शकत नाही. परंतु हे कोलकाताचे दुर्दैव आहे की त्यांच्याकडे असा खेळाडू आहे, जो आपल्या शरीरामुले संघर्ष करताना दिसत आहे.”
कोलकाता संघाने चांगली सुरुवात करुनही बेंगलोरविरुद्धचा सामना ३८ धावांनी गमावला. तत्पुर्वी मुंबई इंडियन्सविरुद्धही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मुंबईने १० धावांनी त्यांना पराभूत केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
क्या यही प्यार है? पतीचे यश पाहून धनश्री वर्माचे डोळे पाणावले, पाहा तो भावुक करणारा क्षण
‘हे’ आहे शिखर धवनच्या तुफान फटकेबाजी मागचे गुपीत, स्वत:च सांगितली ‘राज की बात’
हिम्मत तर पाहा गड्याची! अर्शदीपने धवनपुढेच केली त्याच्या सेलिब्रेशनची ‘कॉपी’, एकदा व्हिडिओ पाहाच