वनडे विश्वचषक 2023 मध्ये गुरूवारी (26 ऑक्टोबर) इंग्लंड आणि श्रीलंका यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजी केली. त्यांनी केवळ 33.2 षटकात इंग्लंडचा 156 धावांमध्ये खुर्दा उडवला. श्रीलंकेसाठी लाहिर कुमारा याने तीन तर पुनरागमन करत असलेल्या ऍंजेलो मॅथ्यूज याने दोन बळी मिळवले.
ENGLAND 156 All-OUT….!!!
This is the lowest score ever in Chinnaswamy stadium in ODI history. pic.twitter.com/sQjfLQpO6o
— Johns. (@CricCrazyJohns) October 26, 2023
जॉनी बेअरस्टो आणि डेविड मलान यांनी इंग्लंडसाठी डावाची सुरुवात चांगल्या पद्धतीने केली. मात्र, संघाची धावसंख्या 45 असताना सातव्या षटकात मलान वैयक्तिक 28 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या जो रुटने अवघ्या 3 धावा करून दहाव्या षटकात विकेट गमावली. संघाला तिसरा झटका बसला तो सलामीवीर जॉनी बेअरस्टो याच्या रुपाने. यष्टीरक्षक फलंदाजाने वैयक्तिक 30 धावा करून चौदाव्या षटकात विकेट गमावली. चौथ्या क्रमांकावर खेळताना बेन स्टोक्स याने महत्वपूर्ण खेळी केली. पण कर्णधार जोस बटलर जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही.
बटलरने 6 चेंडूत 8 धावा केल्यानंतर डावातील 15 व्या षटकात विकेट सोडली. पाचवी विकेट लियाम लिविंगस्टोन याने गमावली. लिविंगस्टोन डावातील 17व्या षटकात फक्त 1 धाव केल्यानंतर बाद झाला. मोईन अली यानेही 15 धावांची खेळी करून विकेट गमावली. ख्रिस वोक्स शुन्यावर बाद झाला. त्यानंतर तळातील फलंदाजांनी काहीसा संघर्ष केला मात्र ते आपल्या संघाला फक्त 156 पर्यंत पोहोचवू शकले.
श्रीलंका संघासाठी लाहिरू कुमारा याने सर्वाधिक तीन बळी मिळवले. त्याला कसून रजिथा व मॅथ्यूज यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवून साथ दिली. इंग्लंडचे तीन फलंदाज धावबाद झाले.
(England Got All Out On 156 Against Srilanka In ODI World Cup 2023)