‘द हंड्रेड’ या स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यादरम्यान भारतीय महिला संघाची फलंदाज हरमनप्रीत कौरने 16 चेंडूमध्ये 29 धावांचा आक्रमक डाव खेळला. हरमनप्रीतीच्या या आक्रमक डावानंतर जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रशंसक, क्रिकेटपटू आणि समालोचकांकडून तिचे कौतुक केले जात आहे. हरमनप्रीत कौरच्या या कामगिरीवर इंग्लंडचा खेळाडू सॅम बिलिंग्जनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. परंतु त्यानंतर त्याच्यावर खूप टीका केल्या जात आहेत.
सॅम बिलिंग्जने हरमनप्रीत कौरचे कौतुक केले आणि तिच्या आक्रमक खेळीबद्दल लिहिले की, ‘हरमनप्रीत कौर ही एक बंदूक आहे.’ दुर्दैवाने, सॅम बिलिंग्जने दिलेली ही प्रतिक्रिया भारतीय चाहत्यांना अजिबात आवडली नाही.
Harmanpreet Kaur is a gun!
— Sam Billings (@sambillings) July 21, 2021
त्यांनी बिलिंग्जवर टीका करण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने लिहिले की, ‘आमच्या (भारतातील) मुलींवर लाइन मारणे बंद कर.’ त्याचबरोबर एका चाहत्याने लिहिले की, ‘तिच्यावर लाइन मारू नको. ती भारतीय नसलेल्या खेळाडूशी लग्न करणार नाही.’
Don't try on her..! She won't marry a non-indian
— Rishab Agrawal (@Rishab__08) July 22, 2021
https://twitter.com/vibhanshu06/status/1418129102578487297?s=20
https://twitter.com/she__nah/status/1418058372729872385?s=20
त्याचबरोबर, सॅम बिलिंग्जवर अनेक चाहत्यांनी टीका केली आहे. या स्पर्धेमध्ये हरमनप्रीत कौरने तिच्या डावात सहा शानदार चौकार ठोकले होते.
हरमनप्रीत कौरच्या या आक्रमक खेळीनंतरही तिच्या मँचेस्टर ओरिजिनल्स महिला संघाला द हंड्रेडच्या सलामीच्या सामन्यात ओव्हल इनविन्सीबल्स महिला संघाच्या हातून पाच गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. द हंड्रेड हे क्रिकेटचे एक नवीन स्वरूप आहे. यात सामना 100 चेंडूंचा असतो. त्याचबरोबर या सामन्यात 1 षटकात 6 चेंडू नसून फक्त 1 षटकात 5 चेंडू असतात.
हरमनप्रीत कौरने 2014 मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. परंतु त्या अगोदर तिने 2009 मध्ये एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. त्याचबरोबर 2009 मध्येच हरमनप्रीतने टी20 मध्ये पदार्पण केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रशिक्षक द्रविड यांचा आवडता बनला आहे ‘हा’ खेळाडू! सातत्याने अपयशी ठरूनही देतायत संधी
‘गरीबों का सस्ता वाला बेन स्टोक्स’; लंकेविरुद्ध सपशेल फ्लॉप ठरलेला हार्दिक झाला ट्रोल
इंग्लंडहून आलं बोलावणं, सूर्यकुमारसह ‘हे’ २ धुरंधर कसोटीत इंग्लंडशी करणार दोन हात!