भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्याला आजपासून नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये प्रारंभ झाला आहे. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने पुढे आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले किंवा सामना अनिर्णित राहिला तरी देखील भारतीय संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होईल. त्यामुळे पाहुणा संघ भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी पूर्ण जोर लावेल हे नक्की. परंतु इंग्लंड संघातून एक वाईट बातमी समोर येत आहे.
इंग्लंडच्या वातावरणात गारवा असतो. त्यामुळे इंग्लिश खेळाडूंना त्या वातावरणाची सवय आहे. भारतात उन्हाळ्याच्या महिन्यात खूपच जास्त उष्णता असते. याचाच फटका इंग्लंडच्या खेळाडूंना बसला आहे. वातावरणात आलेल्या बदलामुळे इंग्लंड संघाच्या काही खेळाडूंच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे.
मालिकेतील चौथा सामना अहमदाबादमध्ये खेळवला जात आहे. अशातच अहमदाबाद शहरातील तापमान अचानक वाढल्यामुळे इंग्लंड संघाचे प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूड आणि संघातील काही खेळाडूंच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे. तसेच पॉल कॉलिंगवूडला डायरिया झाला असल्याची माहिती मिळत आहे. याबाबतची माहिती कर्णधार जो रुटने दिली आहे. परंतु किती सदस्यांची प्रकृती अस्थिर आहे. हे त्याने नाही सांगितले.
रुटने ब्रिटिश पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “संघातील काही खेळाडूंची प्रकृती अस्थिर आहे. या गोष्टीवर आम्ही लक्ष देऊन आहोत. खरं सांगू तर मला नाही माहित की किती खेळाडूंची प्रकृती अस्थिर आहे.”
तसेच विराट कोहली म्हणाला, “भारतीय संघात प्रकृती बाबत चर्चा करण्याचे कारण नाही आहे. सर्व एकदम फिट आहेत. इंग्लंड संघाचे सदस्य वातावरणात फरक पडल्यामुळे आजारी पडले आहेत. गेल्या काही दिवसापासून इकडे खूप उष्णता आहे. दरवर्षी या वेळेस वातावरण असेच असते.या वातावरणाची सवय होण्यासाठी थोडा वेळ लागेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
कुलदीप यादवला दुर्लक्षित का केलं जात? कॅप्टन कोहलीने दिले उत्तर
अग्गबाई, वर एक आणि वधू दोन!! बुमराहची खरी वधूराणी कोण? साउथ अभिनेत्रीसह ‘ही’ स्पोर्ट अँकरही चर्चेत






