इंग्लंडचा संघ पाच वनडे सामने खेळण्यासाठी श्रीलंकेत आला आहे. या मालिकेत इंग्लंड 1-0 असा आघाडीवर आहे. तर उद्या (17 ऑक्टोबर) पल्लेकेले स्टेडियमवर होणाऱ्या तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडचे खेळाडू कॅंडी येथे मैदानावर सराव करत असताना त्यांच्या जवळच तीन फुट लांब कोब्रा हा विषारी साप आढळला.
या सापाला पकडण्यासाठी त्यावेळी सर्पमित्र उपलब्ध नसल्याने मैदानावरील कर्मचाऱ्यांनीच त्याला पकडले. तेथे असलेल्या लाकडी काठीच्या साहय्याने त्यांना सापाला पकडण्यात यश आले. हा व्हीडीओ इंग्लंड अॅंड वेल्स क्रिकेट बोर्डाने (इसीबी) सोशल मिडियावर शेयर केला आहे.
सापाच्या येण्याने इंग्लंडचा घाबरला नाही तर त्यांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले. हा साप पकडल्याने यापुढे आपल्याला सतर्क राहणे जरूरी आहे असे मत इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांनी मांडले.
“हा साप लहान होता, याचा अर्थ येथे मोठे साप असण्याचीही शक्यता आहे”, असेही बेलिस म्हणाले.
A surprise visitor to training this morning… 🐍 pic.twitter.com/ETdHFMuQ2x
— England Cricket (@englandcricket) October 15, 2018
तसेच पहिले हे दोन संघ तीनही प्रकारचे क्रिकेट सामने खेळणार होते. पण त्यामध्ये बदल करून ते आता पाच वनडे सामन्यांची मालिका खेळत आहेत.
यातील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे झालाच नाही तर दुसरा सामना इंग्लंडने जिंकला.
आयसीसी वनडे क्रमवारीत इंग्लंडचा संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर श्रीलंका आठव्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–…जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेटचा रतीब लावणारा गोलंदाज बनतो गायक
–जाणुन घ्या याॅर्कर स्पेशलिस्ट लसिथ मलिंगा २०१९च्या विश्वचषकात खेळणार की नाही?
–३७ षटकारांची बरसात होणाऱ्या त्या टी२० सामन्याबद्दल सर्वकाही…