इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिका सध्या सुरू आहे. मालिकेतील पाच पैकी 4 सामने झाले आहेत. त्यातील सुरवातीचे दोन सामने आस्ट्रेलियाने, तर तिसरा सामना इंग्लंडने जिंकला आहे. चौथा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. 27 जुलैपासून ऍशेस मालिकेचा शेवटचा सामना एरबस्टॉन या ठिकाणी खेळला जाणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. जो संघ चौथा सामना खेळला होता तोच संघ शेवटच्या सामन्यासाठी निवडन्यात आला आहे. पण इंग्लंडचा एक दिग्गज निवृत्ती घेणार असल्याचे समोर येत आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) याच्यासाठी हा शेवटचा सामना असू शकतो. अँडरसन हा आता 41 वर्षाचा झाला आहे. ऍशेस मालिकेच्या 4 कसोटी सामन्यात त्याची कामगिरी निराशाजनक होती. 3 कसोटी सामन्यात त्याने केवळ 4 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय अँडरसनने काही दिवसांपुर्वीच आपण ऍशेस मालिकेनंतर निवृत्ती घेणार असल्याचे संकेतही दिले होते. अशातच अँडरसन निवृत्ती घेणार का? यावर सर्वांची नजर आहे.
सोबतच स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) हे नावही चर्चेत आहे. ब्रॉड देखिल निवृत्ती घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 37 वर्षीय ब्रॉड ऍशेस मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. तो आपल्या संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आला आहे. या कारणाने इंग्लंड संघ ब्रॉडला पुढे खेळण्यासाठी संधी देऊ शकतो. इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रँडन मॅकलम हे नेहमीच आपल्या वरिष्ट खेळाडूंना संधी देत असतात. आता अँडरसन आणि ब्रॉड हे क्रिकेटमधून संन्यास घेणार की नाही? याच्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाचव्या ऍशेस कसोटीसाठी इंग्लंडचा संघ –
बेन स्कोक्स (कर्णधार), हॅरी ब्रुक, मोईन अली, झॅक क्राउली, जोश टंग, जेम्स अँडरसन, बेन डकेत, ख्रिस वोक्स, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), डॅन लॉरेंस, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड, ओली रॉबिन्सन.
महत्वाच्या बातम्या:
हरमनप्रीतच्या अडचणी वाढणार! बांगलादेशविरुद्धच्या गैरवर्तनासाठी मोजावी लागणार मोठी किंमत
थेट पाच महिन्यांनी भारतीय संघ दिसणार व्हाईट जर्सीत! जाणून घ्या शेड्यूल