fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जोफ्रा आर्चरची ‘ती’ चूक इंग्लंडला पडली भलतीच महागात

September 18, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Facebook/ICC

Photo Courtesy: Facebook/ICC


मुंबई । इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका नुकतीच संपली. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. पहिल्या दोन सामन्यांनंतर दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. तिसरा सामना जबरदस्त झाला. पहिल्या दोन चेंडूत दोन गडी गमावल्यानंतर इंग्लंडने धावफलकावर 302 धावा जमावल्या. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने 112 धावा केल्या. याशिवाय सॅम बिलिंग्ज आणि ख्रिस वोक्स यांनी अर्धशतके झळकावली.

ऑस्ट्रेलियालाही प्रत्युत्तरात चांगली सुरुवात मिळाली नव्हती. त्यांनी केवळ 73 च्या एकूण धावसंख्यापर्यंत पाच विकेट गमावल्या होत्या. अ‍ॅरॉन फिंच, मार्कस स्टोईनिस, डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श आणि मार्नस लब्युचेन हे सर्व माघारी परतले होते. ऑस्ट्रेलिया पुन्हा पराभूत होईल असं वाटत होतं. पण सामन्या दरम्यान अशी एक घटना घडली की सामना ऑस्ट्रेलियाकडे झुकला.

पहिले पाच विकेट गमावल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि अ‍ॅलेक्स कॅरी यांनी हळू हळू ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळायला सुरुवात केली. दोघांनी हळू हळू धावा करायला सुरुवात केली. डावातील 20 वे षटक चालू होते. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर चांगला लयीत दिसत होता. पहिल्या तीन चेंडूंवर त्याने फक्त एक धाव दिली. कॅरीने चौथ्या चेंडूवर थर्ड मॅनच्या दिशेने फटका मारला आणि तिथे उभे असलेल्या आदिल रशिदने अलगत झेल टिपला.

ऑस्ट्रेलियाची सहावी विकेट पडली म्हणून इंग्लंडच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले, परंतु पंचांनी नोबॉल घोषित करताच त्यांच्या आनंदावर पाणी फेरले. रीप्लेमध्ये असे दिसून आले की चेंडू टाकताना जोफ्रा आर्चर क्रीझच्या खूप पुढे आला होता. कॅरीला जीवनदान मिळाले आणि त्याने उत्कृष्ट 106 धावा केल्या आणि दुसरा शतकवीर ग्लेन मॅक्सवेल (108 धावा) सोबत सहाव्या विकेटसाठी 212 धावांची भागीदारी केली. या दोन शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामना आणि मालिका दोन्ही जिंकली आहे.


Previous Post

हा कर्णधार म्हणतो, संघ व्यवस्थापनाच्या आवडीनुसार कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो

Next Post

दक्षिण आफ्रिकेचा हा दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये दिसणार नव्या भूमिकेत

Related Posts

Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@RSWorldSeries
टॉप बातम्या

पुन्हा घुमणार ‘सचिन..सचिन’ चा आवाज; सुरू होणार ‘ही’ मोठी स्पर्धा

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

दक्षिण आफ्रिकेचा हा दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये दिसणार नव्या भूमिकेत

Photo Courtesy: Twitter/ IPL

मुंबई इंडियन्स संघात फिनिशरची भूमिका कोण निभवणार? प्रशिक्षकाने दिले उत्तर

Photo Courtesy: Twitter/RCBTweets

अयोग्य खेळाडूंना सपोर्ट करत होता विराट; माजी प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.