मुंबई । इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकलेल्या इंग्लंड संघाने मॅनचेस्टर कसोटी सामन्यात जबरदस्त कमबॅक केले. मँचेस्टर कसोटीच्या दुसर्या दिवशी इंग्लंडच्या दोन फलंदाज डॉम सिब्ले आणि बेन स्टोक्सने शानदार शतक ठोकले. प्रथम सिब्लेने 312 चेंडूत शतक पूर्ण केले आणि त्यानंतर बेन स्टोक्सनेही आपल्या कारकीर्दीतील सर्वात धीमे कसोटी शतक झळकावले. बेन स्टोक्सने 255 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
स्टोक्सचे हे कसोटीतील दहावे तर वेस्ट इंडिजविरुद्ध त्याचे दुसरे शतक आहे. शतक झळकावल्यानंतर स्टोक्सने उत्सुकतेने हावभाव करत आनंद साजरा केला. रोस्टन चेसच्या चेंडूवर शतक झळकावल्यानंतर बेन स्टोक्सने आपले हेल्मेट जमिनीवर ठेवले आणि मग डाव्या हात गल्व बाहेर काढला. यानंतर, त्याने मधले बोट वाकवून हावभाव केला. वास्तविक, असे करून स्टोक्सने त्याच्या वडिलांना सलामी दिला. बोट वाकण्याच्या मागे त्याच्या वडिलांची प्रेरणादायक कहाणी आहे.
न्यूझीलंडमध्ये जन्मलेले बेन स्टोक्सचे वडील गेड स्टोक्स हे रग्बी खेळाडू होते आणि कोचिंगनंतर ते आपल्या मुलासह इंग्लंडला गेले, परंतु प्रशिक्षक होण्यापूर्वी ते खेळाडू होते. त्यांच्या खेळाची कारकीर्द वाढवण्यासाठी आणि ऑपरेशनमुळे बाहेर बसण्याऐवजी त्यांनी बोट कापून टाकले होते. गेड यांना मधल्या बोटाची समस्या होती.
Best cricketer in the world 👑
Scorecard/Videos: https://t.co/uLg0r9IjHB#ENGvWI pic.twitter.com/eGoWNbGnGu
— England Cricket (@englandcricket) July 17, 2020
2015 सालच्या एका वृत्तानुसार, गेड यांनी वैद्यकीय सल्लाही घेतला. डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करण्यास सांगितले, ज्यामुळे त्यांना बरेच दिवस खेळापासून दूर रहावा लागले. पण गेडला सतत खेळायचे होते आणि सतत पैसे कमवायचे होते. म्हणूनच त्याने इतर पर्यायाबद्दल विचारले आणि गेडला दुसरा पर्याय निवडत त्यांच्या हाताचे बोट कापून टाकले. म्हणूनच बेन स्टोक्सने आपल्या वडिलांच्या संघर्षाला सलाम करत असे केले. दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्यानंतर बेन स्टोक्सने बोट वाकडे करून जल्लोष केला होता.