अखेर रविवारी वेस्ट इंडिज व इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिजने जिंकला. कोरोनामुळे ४ महिने एकही आंतरराष्ट्रीय सामना झाल्या नसल्याने या सामन्याला भलतेच महत्त्व होते.
३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिज संघाने १-० अशी आघाडीही घेतली आहे. परंतु या सामन्यात आयसीसीने काही नवे नियम केले होते. त्यातील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे खेळाडूंना चेंडूला लाळ लावता येणार नव्हती.
या सामन्यात इंग्लंड संघाचे संकट तेव्हा वाढले, जेव्हा त्यांना मुख्य गोलंदाज जेम्स अँडरसन चेंडूला लाळ लावताना कॅमेऱ्यात कैद झाला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे.
Jimmy Anderson blatantly putting saliva on the ball, pretty sure that's outlawed #bbccricket pic.twitter.com/MKDlM62ht6
— Si Lomas (@SLomasSCFC1883) July 12, 2020
२०० धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिज संघ जेव्हा फलंदाजी करत होता, तेव्हा ८व्या षटकात अँडरसनचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. असे असले तरी या व्हिडीओत अँडरसन नक्की लाळ लावतोय की नाही हे व्हिडीओ अर्धाच असल्याने स्पष्ट होतं नाही.