fbpx
Saturday, April 10, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तब्बल ११७ दिवसांनी सुरू झाले क्रिकेट; २५ वर्षात पहिल्यांदाच नाही दिसणार इंग्लंडचा १२वा खेळाडू

July 8, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

नवी दिल्ली। आता जवळपास ४ महिन्यांच्या अंतरानंतर इंग्लंडच्या भूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू होत आहे. तेथे आजपासून (८ जुलै) वेस्ट इंडिज संघ आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना साऊथॅम्प्टनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. परंतु इंग्लंड संघ आपल्या १२ व्या खेळाडूशिवाय मैदानात उतरणार आहे.

इथे १२ वा खेळाडू इतर कोणी नसून इंग्लंड संघाची कट्टर समर्थक बार्मी आर्मी आहे. यावेळी स्टेडियममध्ये प्रवेश न मिळण्याच्या कारणामुळे ते आपली उपस्थिती दर्शवू शकणार नाहीत.

बार्मी आर्मी- इंग्लंडचा १२वा खेळाडू

इंग्लंडच्या कसोटी सामन्यांमध्ये असे अनेक प्रसंंग आले आहेत, जिथे बार्मी आर्मी संघाच्या १२ व्या खेळाडूप्रमाणे असायची. आज म्हणजेच ८ जुलैला पहिल्यांदा जेव्हा बेन स्टोक्स इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे, तेव्हा ही ‘बार्मी आर्मी’ (Barmy Army) मात्र स्टेडियममध्ये दिसणार नाही. या आर्मीचे सह- संस्थापक पॉल बर्नहॅम म्हणतात, बार्मी आर्मीशिवाय इंग्लंडच्या कसोटी सामन्याचा विचारही करू शकत नाहीत.९० च्या दशकापासून बार्मी आर्मीने आतापर्यंत खूप मोठा प्रवास केला आहे.

“चाहत्यांबरोबर हे काही विचित्र घडत आहे. चाहत्यांना खेळाडूंची आठवण येईल आणि खेळाडूंना चाहत्यांची,” असे बर्नहॅम म्हणाले.

‘२५ वर्षांमध्ये कसोटीतील अनुपस्थिती विचित्र’

बार्मी आर्मीने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (England Cricket Board) विनंती केली होती, की त्यांनी कसोटी सामन्यादरम्यान त्यांचे गीत लावावे. परंतु आतापर्यंत त्यांच्या विनंतीला कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

या आर्मीला परदेशात आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी ओळखले जाते. असे असले तरी ते मायदेशातील सामन्यांमध्येही संघाला पाठिंबा देत असतात. “आम्ही इंग्लंडमध्ये एक लहान समूहाप्रमाणे आहोत. आम्ही हजारो लोक आपल्या वार्षिक सुट्टीचा वापर करत परदेश दौरा करतो. परंतु होय, आता २५ वर्षे झाली आहेत आणि अशामध्ये कसोटी सामन्यात अनुपस्थित राहणे विचित्र असेल” असेही ते पुढे म्हणाले.

बार्मी आर्मीच्या नादाला लागू नका

ऍशेस मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये विशेषत: बार्मी आर्मीची उपस्थिती विरोधी संघासाठी डोकेदुखी सिद्ध होत आली आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर (Justin Langer) यांनी आपल्या संघाला बार्मी आर्मीच्या नादाला न लागण्याचा सल्ला दिला होता. ते म्हणाले होते, “बार्मी आर्मीबद्दल एक गोष्ट मला माहीत आहे, की ते नेहमी इंग्लंड क्रिकेट संघाबरोबर असतात आणि याचा मी आदर करतो.”

बर्नहॅम म्हणतात, “तुम्ही क्रिकेटसारख्या खेळात जाण्यासाठी आणि ६ तास घालविण्यासाठी खूप सारे पैसे देता. आम्हाला माहीत आहे, की जर आम्ही हा वेळ योग्य पद्धतीने खर्च केला, तर याचा इंग्लंड क्रिकेट संघावर परिणाम होऊ शकतो. कदाचित त्यांना विकेटही मिळू शकते. आम्ही बिनशर्त त्यांचे समर्थन करतो. परिणाम काहीही असो, आम्ही सक्रिय समर्थक आहोत, निष्क्रीय चाहते नाहीत. आणि खेळाडूही याचे कौतुक करतात.”

सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्यास बंदी आहे

ट्रेंडिंग घडामोडी-

-“येत्या १० वर्षात धोनी होणार सीएसकेचा बॉस”

-इंग्लंड वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत हे ५ खेळाडू ठरु शकतात हिरो

-हॅप्पी बर्थडे दादा…!!!


Previous Post

कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून देशासाठी लढणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा इंग्लंड टीमने केला असा सन्मान

Next Post

भविष्यात भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळ्याची क्षमता ठेवणारे ३ युवा गोलंदाज

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चांगल्या स्थितीत असताना रोहितच्या मुंबईला लोळवणारा कोण आहे हा हर्षल पटेल?

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/Twitter
IPL

तेराव्या हंगामाखेर चाहत्यांना दिलेला शब्द धोनी आज खरा करुन दाखवणार? पाहा काय होते ते वचन

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/cricket.com.au
IPL

MI की RCB, सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल जोडप्याचा पाठिंबा कोणाला? पाहा त्यांची टीम हारली का जिंकली?

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

ग्लेन मॅक्सवेलवरुन बेंगलोर आणि पंजाब आमने-सामने; रंगले ट्विटर वॉर

April 10, 2021
Photo Courtesy; Twitter/@anavin74
Covid19

‘तुम्ही पहिले मास्क घालून या’, चाहत्यांचा सोशल मीडियावर सौरव गांगुली-जय शहांना दणका

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/@IPLT20.com
IPL

कृणाल पंड्याच्या ‘सुपर थ्रो’ने आरसीबी चाहत्यांचा रोखला होता श्वास; पाहा डिविलियर्सला धावबाद केलेला तो क्षण

April 10, 2021
Next Post

भविष्यात भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळ्याची क्षमता ठेवणारे ३ युवा गोलंदाज

या ५ कारणांमुळे एमएस धोनी बनला जागतिक क्रिकेटमधील महान खेळाडू

इंग्लंड वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत हे ५ खेळाडू ठरु शकतात हिरो

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.