भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना बुधवारी (१४ जुलै) खेळला गेला. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी होती. परंतु या सामन्यात इंग्लंड महिला संघाने ८ गडी राखून विजय मिळवला आहे.
या सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून स्म्रिती मंधानाने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान तिने ८ चौकार आणि २ षटकार लगावले. तसेच कर्णधार हरमनप्रीत कौरने ३६ धावांचे योगदान दिले होते. स्म्रिती मंधाना आणि हरमनप्रीत या दोघींनी मिळून तिसऱ्या गडीसाठी ६८ धावांची भागीदारी केली होती. २० षटक अखेर भारतीय महिला संघाला ६ बाद १५३ धावा करण्यात यश आले होते. (England women’s beat indian women’s team by 8 wickets)
भारतीय महिला संघाने दिलेल्या १५४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंड महिला संघाकडून डॅनियल वॅटने अवघ्या ५६ चेंडूत नाबाद ८९ धावांची तुफानी खेळी केली. या खेळी दरम्यान तिने १२ चौकार आणि १ षटकार लगावला होता. स्किवरने ४२ धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते. या खेळीत ४ चौकारांचा समावेश होता. या खेळीच्या जोरावर इंग्लंड महिला संघाने ८ गडी आणि ८ चेंडू शिल्लक ठेऊन हा सामना जिंकला. यासोबतच ही मालिका देखील २-१ ने आपल्या नावावर केली.
Congratulations @englandcricket 🎉
A brilliant knock by @Danni_Wyatt steers England to a T20 victory.
And England win the multi-format series 10-6 🏆#ENGvIND | https://t.co/maY0IvmD21 pic.twitter.com/5Q5ZYvuvfE
— ICC (@ICC) July 14, 2021
भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो
भारतीय महिला संघाकडून प्रथम फलंदाजी करताना, स्म्रिती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौरला वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. या सामन्यात शेफाली वर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु ती २ चेंडू खेळत भोपळाही न फोडता मागे परतली. तसेच हरलीन देओलला देखील अवघ्या ६ धावा करता आल्या. त्यामुळे २० षटक अखेर भारतीय महिला संघाला अवघ्या १५३ धावा करण्यात यश आले होते. या सामन्यात पराभूत होत भारतीय महिला संघाने सलग चौथी टी-२० मालिका गमावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत, ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड नव्हे तर ‘हा’ संघ पटकावेल टी२० विश्वचषक- दीप दासगुप्ता
‘या’ ६ भारतीय धुरंधराचे श्रीलंका दौऱ्यावर उजळणार नशीब, मिळू शकते पदार्पणाची संधी
स्टार्क-रसेलमध्ये वर्चस्वाची लढाई, ६ चेंडूत ११ धावांची गरज असताना ऑसी दिग्गजाने ‘अशी’ मारली बाजी