ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात सध्या ७२ वी ऍशेस मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर झाला. या स्टेडियममध्ये सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. तसे, तर ऍशेस मालिका म्हटलं की, मैदानात अनेक गोष्टी घडत असतात, ज्या चर्चेचा विषय ठरतात. पण, या सामन्यादरम्यान स्टेडियमच्या स्टँडमध्ये बसलेल्या प्रेक्षकांमध्ये अशी एक घटना घडली की सर्वांचे लक्ष त्याकडे वेधले गेले.
झाले असे की गॅबा कसोटी सुरु असताना तिसऱ्या दिवशी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या इंग्लंडच्या रॉब हाले या व्यक्तीने त्याची ऑस्ट्रेलियन प्रेयसी नतालीला गुडघ्यावर लग्नाची मागणी घातली. नतालीनेही त्याची ही मागणी स्वीकारत होकार दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तसे तर, यापूर्वी अनेकदा लाईव्ह सामन्यात एखाद्या प्रेक्षकाकडून आपल्या प्रेयसी किंवा प्रियकराला लग्नाची मागणी घातल्याच्या घटना घडल्या आहेत. अगदी काहीदिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटपटू दीपक चाहरने स्टँडमध्ये बसलेल्या आपल्या प्रेयसीला मागणी घातली होती. पण रॉब आणि नताली यांच्या प्रेमकहाणीत ऍशेस मालिकेचा मोठे योगदान आहे. कारण, त्यांची प्रेम कहाणीची सुरुवातच ऍशेस मालिकेपासून झाली होती. याबाबत बार्मी आर्मीने ट्वीट करत माहिती दिली. या माहितीनुसार रॉब आणि नताली २०१७ साली ऍशेस मालिकेदरम्यान भेटले होते.
Congratulations to Rob Hale who travelled with us Down Under in 2017 where he met Natalie 👫
Last night they got engaged at the Gabba 💍#Ashes pic.twitter.com/iZR2cFnmrb
— England's Barmy Army 🏴🎺 (@TheBarmyArmy) December 10, 2021
दरम्यान, रॉबने नतालीला हुशारीने लग्नाची मागणी घातली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की नतालीला रॉब काय करणार आहे, याची कोणतीच कल्पना नव्हती. पण, त्याने काही क्षणासाठी तिची नजर दुसरीकडे नेली आणि तेवढ्यात तो गुडघ्यावर बसला आणि त्याने तिला लग्नासाठी विचारले. त्यावेळी त्याला असे गुडघ्यावर बसून लग्नाची मागणी घालताना पाहून ती आश्चर्यचकीत झाली. पण तिने लगेचच होकार दिला. त्यानंतर या दोघांनी एकमेकांना किस करत आपले प्रेम जगासमोर मान्य केले.
She said yes! How good! pic.twitter.com/Mc7erNaeYO
— 7Cricket (@7Cricket) December 10, 2021
सामन्याची स्थिती
गॅबा कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव १४७ धावांवर संपुष्टाता आला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४२५ धावा केल्या आणि २७८ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात ७० षटकांत २ बाद २२० धावा केल्या. तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत इंग्लंड ५८ धावांनी आघाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विक्रमवीर रूट!! गॅबा कसोटीत अर्धशतकी खेळी करत माजी इंग्लिश कर्णधारासह पाँटिंगला पछाडले
फलंदाज म्हणून ‘हिट’, तर कर्णधार म्हणून ‘सुपरहीट’ ठरलाय रोहित शर्मा; पाहा आकडेवारी