इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंड येथे रंगला होता. या सामन्यात इंग्लंडने पाच विकेट्सने विजय मिळवत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात इंग्लंडचा पूर्व कर्णधार असलेला फलंदाज जो रूटने नाबाद ११५ धावा करत अनेक विक्रम रचले आहेत. त्याचे हे कसोटीमधील २६वे शतक ठरले आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असता रूट ७७ धावांवर खेळत होता. त्याने २३ धावा करताच कसोटी क्रिकेटमधील दहा हजार धावांचा आकडा पार केला आहे. याबरोबरच तो कसोटीमध्ये दहा हजार धावा करणारा ऍलिस्टर कूक (Alastair Cook) नंतर दुसराच इंग्लंडचा फलंदाज ठरला आहे. कूकने १६१ सामन्यात १२४७२ धावा केल्या आहेत.
रूटच्या (Joe Root) नावावर याआधी कसोटीमध्ये इंग्लंडकडून जलद नऊ हजार धावा करण्याचा विक्रम होता. त्याने दहा हजार धावा करताच तो कसोटी क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा चौदावा फलंदाज ठरला आहे.
कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने २०० कसोटी सामन्यात ५३.७८च्या सरासरीने १५९२१ धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याचा क्रमांक लागतो. त्याने १६८ सामन्यात ५१.८५च्या सरासरीने १३३७८ धावा केल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज-
१५९२१ – सचिन तेंडुलकर (भारत)
१३३७८ – रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)
१३२८९ – जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)
१३२८८ – राहुल द्रविड (भारत)
१२४७२ – ऍलिस्टर कूक (इंग्लंड)
१२४०० – कुमार संगकारा (श्रीलंका)
११९५३ – ब्रायन लारा (वेस्ट इंडिज)
११८६७ – शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडिज)
११८१४ – माहेला जयवर्धने (श्रीलंका)
१११७४ – ऍलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
१०९२७ – स्टिव्ह वॉ (ऑस्ट्रेलिया)
१०१२२ – सुनील गावसकर (भारत)
१००९९ – युनूस खान (पाकिस्तान)
१००१५ – जो रूट (इंग्लंड)*
कसोटीमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पार करणारा रूट हा सर्वात युवा फलंदाजही ठरला आहे.
३१ वर्ष १५७ दिवस – जो रूट*
३१ वर्ष १५७ दिवस- ऍलिस्टर कूक
३१ वर्ष ३२६ दिवस- सचिन तेंडुलकर
इंग्लंडचा संघ नवीन कर्णधार बेन स्टोक्स आणि मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या पदाखाली पहिलाच सामना खेळत होते. यामध्ये नाणेफेक न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने जिंकला होता. त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांचे पहिले डाव १५० धावांच्या आतच संपुष्टात आले होते. दुसऱ्या डावात डेरिल मिशेलने १०८ धावा करत न्यूझीलंडच्या सर्वबाद २८५ धावा झाल्या. या सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांनी उत्तम गोलंदाजी करत १७ विकेट्स काढल्या होत्या.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी मुद्दाम सचिनला मारण्याच्या हेतूने धोकादायक गोलंदाजी करत होतो’, १६ वर्षांनंतर अख्तरचा मोठा खुलासा
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दम दाखवला, तर ‘या’ भारतीय खेळाडूंची विश्वचषकात जागा फिक्स?