भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १ डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला होता. हा सामना जिंकून भारतीय संघाने मालिका ३-१ ने आपल्या नावावर केली होती. या सामन्यात रिषभ पंतने शतकीय खेळी केली होती. तसेच नाबाद ९६ धावांची खेळी करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरचे देखील सर्वत्र कौतुक केले गेले होते. अशातच माजी भारतीय फलंदाज वसीम जाफर यांनी देखील मीम शेअर करत सुंदरचे कौतुक केले होते. त्यांनतर सुंदरने त्या ट्वीटला दिलेली मजेशीर प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघाचा माजी फलंदाज वसीम जाफर सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतो. तसेच तो आपल्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत देखील असतो. इंग्लंड विरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ९६ धावांची खेळी केली होती. शतक करण्यासाठी अवघे ४ धावा उरले असताना ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल हे तळातील फलंदाज एका पाठोपाठ एक बाद झाले होते.
या तिन्ही खेळाडूंची पायखेची करताना वसीम जाफर यांनी ट्विट केले होते. ज्यामध्ये, त्यांनी ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील एक फोटो पोस्ट केला होता. ज्यात अमीर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी हातात ताट घेऊन उभे असल्याचे दिसते. तसेच कॅप्शन म्हणून जाफर यांनी, “जेव्हा अक्षर, ईशांत आणि सिराज पुढच्या वेळेस सुंदरच्या वडिलांना भेटतील तेव्हा. परंतु ९६ धावांची खेळी शतक पेक्षा कमी नव्हती,’ असे लिहले होते.
Axar, Ishant and Siraj next time they meet Washington's father at a function????
But seriously this 96* is no less than a hundred, very well played @Sundarwashi5 ???????? #INDvENG pic.twitter.com/V6qRXBbwfl— Wasim Jaffer (@WasimJaffer14) March 6, 2021
सुंदरचा मजेशीर प्रतिसाद
वसीम जाफर यांनी या ट्विटमध्ये सुंदरचे कौतुक केले होते तसेच, सुंदर ९६ धावांवर फलंदाजी करत असताना त्याला शतक करण्यासाठी अवघ्या ४ धावांची गरज होती. त्यावेळी अक्षर पटेल ४३ धावांवर बाद होत माघारी परतला. नंतर फलंदाजीला आलेल्या ईशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांना भोपळा देखील फोडता आला नाही. त्यामुळे सुंदरचे शतक राहून गेले होते. म्हणूनच वसीम जाफरने तिघांना ट्रोल करण्यासाठी ट्विट केले होते.
यावर सुंदरने मजेशीर प्रतिक्रिया देत लिहिले की, “तुमचे मनःपूर्वक आभार, माझे वडील बिर्याणी आणि हलवा घेऊन त्या तिघांचे स्वागत करणार आहे”. तसेच पुढे त्याने हसण्याचे इमोजी देखील टाकले होते.
Thanks a lot bhaiya! ???? Dad will definitely treat them with a lot of biryani and Halwa! ????
— Washington Sundar (@Sundarwashi5) March 8, 2021
कसोटी मालिकेनंतर आता १२ मार्चपासून भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“एकीकडे पंत फटकेबाजी करत होता, दुसरीकडे बटलर हॉटेलमध्ये आराम..,” इंग्लिश दिग्गजाचा घरचा आहेर
“अक्षरच्या प्रदर्शनानंतर जडेजाचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणे कठीण”
थाला इज बॅक! विरोधी संघांची उडाली झोप, धोनीने सुरू केली आयपीएलची तयारी; पाहा फोटो