क्रिकेटच्या मैदानात आपल्याला अनेकदा काही असे झेल पाहायला मिळतात, जो पाहिल्यानंतर चाहतेच नाही, तर मैदानातील खेळाडूही हैराण होतात. असाच एक झेल आपल्याला युरोपियन क्रिकेट लीग दरम्यान पाहायला मिळाला. हा झेल पाहिल्यानंतर चाहत्यांना त्याला क्रिकेटच्या इतिसाहातील सर्वश्रेष्ठ झेलांपैकी एक म्हणूनही घोषित केले आहे.
मागच्या काही दिवसांमध्ये युरोपियन क्रिकेट लीग (European cricket league) मधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपण अनेकदा पाहिले आहे की, जेव्हा सीमारेषेजवळ दोन खेळाडू क्षेत्ररक्षण करत असतात, त्यावेळी बऱ्याचदा झेल पकडताना त्यांची टक्कर होत असते आणि परिणामी झेल सुटतो. परंतु युरोपियन क्रिकेट लीग दरम्यान असा झेल पाहायला मिळाला आहे, जो घेताना खेळाडू एकमेकांना धडकले, परंतु झेल मात्र सुटला नाही. यादरम्यान खेळाडूंनी एकमेकांची गळाभेटही घेतली.
मागच्या महिन्यात सुरू झालेल्या युरोपियन क्रिकेट लीगच्या अंतिम सामन्यात ही घटना घडली आहे. या अंतिम सामन्यादरम्यान पाहायला मिळाले की, फलंदाजाने लेग साइडच्या दिशेने मोठा फटका खेळला आणि चेंडू खूप वेळ हवेत राहिला. फलंदाजाने मारलेला चेंडू झेलण्यासाठी सीमारेषेजवळ उभे असलेले दोन्ही क्षेत्ररक्षक एकाच दिशेने धावत आले आणि शेवटी एकमेकांना जाऊन धडकले. त्यामुळे झेल सुटण्याची अपेक्षा असताता त्यातील एका खेळाडूने झेल घेतल्याचे दिसते. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/tv/CbC0e4boaRB/
अंतिम सामन्यादरम्यान या दोन क्षेत्ररक्षक खेळाडूंमध्ये टक्कर झाल्यानंतर कुणालाच वाटले नव्हते की, हा झेल होऊ शकेल. पंरतु खेळाडूने चपळाई दाखवली आणि चेंडू हातात घट्ट पकडून ठेवला. यावेळी हा झेल पाहून मैदानातील प्रत्येक खेळाडूही हैराण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, मागच्या एक महिन्यापासून युरोपियन क्रिकेट लीग चाहत्यांचे मनोरंजन करत होती. यादरम्यान अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाले, हा त्यापैकीच एक ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या –
केरला ब्लास्टर्स तिसऱ्यांदा फायनलमध्ये; लीग शील्ड विजेत्या जमशेदपूरचे पॅकअप