शनिवारी(१७ ऑक्टोबर) आयपीएल २०२० मध्ये ३४ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात दिल्लीने ५ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईने दिल्लीला १८० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग दिल्लीने १९.५ षटकात सहज पूर्ण केला.
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई संघाचा या हंगामातील ६ वा पराभव आहे. त्यांनी या हंगामात आत्तापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांपैकी केवळ ३ सामन्यात विजय मिळवला आहे. चेन्नई गुणतालिकेत सध्या ६ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता चेन्नईसमोर प्लेऑफ अर्थाच अंतिम चार संघात पोहचण्यासाठी कठीण आव्हाने आहेत. अनेकांना तर असे वाटत आहे की चेन्नई आला प्लऑफमध्ये पोहचणार नाही. पण अजूनही चेन्नईसाठी प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची दारे पूर्णपण बंद झालेली नाहीत.
चेन्नई अजूनही कशाप्रकारे प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकतात त्यासाठीची समीकरणे कशी असावी लागतील याचा आपण आढावा घेऊ.
प्लेऑफमध्ये पात्र ठरण्यासाठी चेन्नई समोरची समीकरणे –
चेन्नईचे अजून ५ सामने या हंगामातील बाकी आहेत. या ५ सामन्यात चेन्नईला चांगली कामगिरी तर करावी लागेलच त्याचबरोबर हेे सामने जिंकावेही लागली. चेन्नईला राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब या संघांविरुद्ध हे ५ सामने खेळायचे आहेत. या ५ सामन्यातील कमीत कमी ४ सामने तरी चेन्नईला जिंकावे लागतील, जेणेकरुन त्यांचे १४ गुणतरी होतील आणि त्यांच्या प्लेऑफच्या आशा कायम राहतील.
पण याचबरोबर चेन्नईला अन्य संघांच्या सामन्यांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल. त्यांना आशा करावी लागेल की कोलकाता त्यांच्या उर्वरित सामन्यांपैकी ४ सामने हारतील, तसेच राजस्थान, पंजाब आणि हैदराबादही त्यांच्या प्रत्येकी २ सामन्यात पराभूत होतील. तर जेणेकरुन त्यांचे १२ पेक्षा अधिक गुण होणार नाहीत.
सध्या अशी आहे गुणतालिका –
सध्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सचा संघ ९ सामन्यातील ७ विजयांसह १४ गुण घेत अव्वल क्रमांकावर आहे. तसेच मुंबई इंडियन्स ८ सामन्यांतील ६ विजय आणि १२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ ९ सामन्यांतील ६ विजयांच्या १२ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे सध्यातरी दिल्ली, मुंबई आणि बेंगलोर हे तीन संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत.
त्यामुळे सध्या प्लेऑफमधील ४ थ्या स्थानासाठी कोलकाता नाईट रायडर्स, किंग्स इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघात चूरस आहे. सध्यातरी कोलकाता ८ सामन्यांत ४ सामने जिंकून ८ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर हैदराबाद, चेन्नई आणि राजस्थान प्रत्येकी ६ गुणांसह अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहे. तर पंजाब ४ गुणांसह शेवटच्या क्रमांकावर आहे.
या आयपीएल२०२० मधील ३४ व्या सामन्यानंतर आयपीएलची गुणतालिका अर्थात पॉईंट टेबल –
१- दिल्ली कॅपिटल्स : (सामने ९, विजय ७, पराभव २, गुण १४, नेट रन रेट +०.९२१)
२- मुंबई इंडियन्स: (सामने ८, विजय ६, पराभव २, गुण १२, नेट रन रेट +१.३५३)
३- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : (सामने ९, विजय ६, पराभव ३, गुण १२, नेट रन रेट -०.०९६)
४- कोलकाता नाइट रायडर्स : (सामने ८, विजय ४, पराभव ४, गुण ८, नेट रन रेट -०.६८४)
५- सनरायझर्स हैदराबाद : (सामने ८, विजय ३, पराभव ५, गुण ६, नेट रन रेट +०.००९)
६- चेन्नई सुपरकिंग्ज : (सामने ९, विजय ३, पराभव ६, गुण ६, नेट रन रेट -०.३८६)
७- राजस्थान रॉयल्स : (सामने ९, विजय ३, पराभव ६, गुण ६, नेट रन रेट -०.७७८)
८- किंग्स XI पंजाब : (सामने ८, विजय २, पराभव ६, गुण ४, नेट रन रेट -०.२९५)
महत्त्वाच्या बातम्या –
ड्रेसिंग रुममध्ये सिगारेट ओढताना रंगेहात पकडला गेला फिंच, व्हिडिओ व्हायरल
…म्हणून ब्राव्होऐवजी जडेजाने केली शेवटच्या षटकात गोलंदाजी, धोनीने सांगितले कारण
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
-यंदा दिल्ली कॅपिटल्स का करत आहे जबरदस्त कामगिरी? जाणून घ्या यशाची ३ कारणे