भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi) यांच्यात नुकतीच मायदेशातील टी-२० मालिका पार पडली. युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन (ishan kishan) याला रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. पण तो अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. अशात भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (rahul dravid) यांनी ईशानची पाठराखण करण्याचे काम केले आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ईशान किशनने ३५, दुसऱ्या सामन्यात १०, तर तिसऱ्या सामन्यात ३१ धावा केल्या होत्या. या प्रदर्शनानंतर त्याच्यावर टीका झाली. पण राहुल द्रविड मात्र त्याच्या बाजून उभे राहिले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना द्रविड म्हणाले, “आम्ही स्वतःला फक्त १५ खेळाडूंपर्यंत मर्यादित ठेऊ इच्छित नाही. आम्ही खेळाडूंना संधी देऊ इच्छितो. आम्हाला हे सुनिच्छित आहे की, जेव्हा आम्ही विश्वचषक खेळायला जाऊ, तेव्हा आमच्या प्रत्येक खेळाडूकडे किमान १५-२० सामन्यांचा अनुभव असावा. यामुळे रोहितला त्याच्यासोबत संतुलन बनवण्याची संधी मिळेल. आम्हाला एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यानंतर बॅक अपच्या रूपात काही खेळाडू पाहिजेत.”
युवा अष्टपैलू वेंकटेश अय्यरलाही वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत संधी दिली गेली होती. त्याने मालिकेती चांगले प्रदर्शन केले आणि यासाठी द्रविडने त्याचे कौतुकही केले. मुख्या प्रसिक्षक म्हणाले की, “आम्हाला माहिती आहे की, तो त्याच्या आयपीएल फ्रेंचायझीसाठी सलामीवीराची भूमिका पार पाडतो. परंतु आमचे मत स्पष्ट आहे की, आम्ही त्याला आपल्या परिस्थितीनुसार भूमिका देऊ इच्छितो. आपल्याकडे पहिल्या तीनमध्ये जागा नाहीय. त्यामुळे आम्ही त्याच्यासमोर एक आव्हान ठेवले होते. आम्ही त्याच्यावर एक भूमिका सोपवली आणि प्रत्येक वेळी त्याने चांगला खेळ दाखवला. त्याच्यात सुधार दिसला, जो पाहून खरोखर चांगले वाटले. ”
दरम्यान, वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी२० मालिकेतील सर्वच्या सर्व सामने भारताने जिंकले. आगामी मालिकेत भारतीय संघासमोर श्रीलंका संघाचे आव्हान असेल. भारत आणि श्रीलंका यांच्यात मायदेशातील तीन सामन्यांची टी२० आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल.
महत्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्सची वाढली चिंता! कोट्यावधी रुपये खर्चून घेतलेला ‘तो’ फलंदाज ठरतोय पूरता फ्लॉप
PHOTO: विश्रांतीच्या काळात रिषभ आजमवतोय ‘या’ खेळात हात; चाहते म्हणाले..
ऑरेंज कॅप विजेताच म्हणतोय, “आयपीएलमध्ये लिलाव नसावा”