रवी बिश्नोई याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 18.22 च्या सरासरीने 9 विकेट्स घेतल्या, ज्यामुळे त्याला आयसीसी क्रमवारीत मदत झाली. ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर बिश्नोई आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये नंबर वन गोलंदाज बनला आहे. अफगाणिस्तानच्या राशिद खान याला मागे टाकत त्याने अव्वल स्थान मिळवले. आता नंबर वन झाल्यानंतर बिष्णोईने प्रतिक्रिया दिली आणि आपण असे स्वप्नातही पाहिले नव्हते असे सांगितले.
बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये नंबर वन बनल्यानंतर रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याची प्रतिक्रिया दिसली. व्हिडिओमध्ये, बिश्नोई म्हणाला, “नक्कीच, ही खूप वेगळी भावना आहे. कारण नंबर वन गोलंदाज बनणे, मी हे स्वप्नातही पाहिले नव्हते. नुकतेच तिथे पोहोचलो हे खूप छान वाटते. मी इथेच राहण्याचा प्रयत्न करेन आणि जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा संघासाठी चांगले काम करेन आणि संघाला विजय मिळवून देईन.”
पुढे बोलतोना तो म्हणाला, “1 फेब्रुवारीला पदार्पण झाले. सुरुवातीपासूनच या प्रवासात चढ-उतार आले, पण गेले वर्ष चांगले गेले कारण मला संघासोबत चांगले सामने खेळायला मिळाले. अनेक चांगल्या स्पर्धा आणि आशिया कप झाला. मधल्या काळात मी आशियाई खेळांनाही गेलो होतो, तोही वेगळा अनुभव होता. मी फक्त चांगली कामगिरी करण्याच्या संधीची वाट पाहत होतो. ही गेल्या 5-7 वर्षांची मेहनत आहे. त्यानंतर, सध्या सुरू असलेला प्रवास खूप छान चालला आहे आणि मी त्याचा आनंद घेत आहे.”
How does it feel to become the ICC Men's No. 1️⃣ T20I Bowler 🤔
Hear what #TeamIndia leg-spinner Ravi Bishnoi said 👇#SAvIND pic.twitter.com/Szg1BYfFeD
— BCCI (@BCCI) December 8, 2023
बिश्नोईने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 21 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 17.38 च्या उत्कृष्ट सरासरीने 34 विकेट्स घेतल्या आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. (Even in such a dream Ravi Bishnoi’s special reaction after becoming the number one bowler in T20)
महत्वाच्या बातम्या
हैदराबाद पस्तावणार! ज्या खेळाडूला केले रिलीज, त्याने 2 ओव्हरमध्ये हॅट्रिकसह घेतल्या 5 विकेट्स; वाचाच
BCCI Net Worth: वर्ल्डकप 2023मुळे बीसीसीआयच्या नेटवर्थमध्ये प्रचंड वाढ, ऑस्ट्रेलियापेक्षा 28 पटींनी श्रीमंत